Prataprao Jadhav Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Issue : पीकविम्याच्या मुद्यावर कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत कंपनीची बैठक लावा

Prataprao Jadhav : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना पीकविमा कंपनी शेतकऱ्यांचे दावे फेटाळत आहे. यासंदर्भात तातडीची बैठक कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत लावावी.

Team Agrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना पीकविमा कंपनी शेतकऱ्यांचे दावे फेटाळत आहे. यासंदर्भात तातडीची बैठक कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत लावावी अशी सूचना केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली.

मागील महिनाभरामध्ये जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडून जाऊन पिकेही वाहून गेली. तर अनेक शेतात पाणी तुंबल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी पुरामुळे शेतात पाणी घुसले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पीकविमा कंपनीच्या वतीने सर्व्हे करण्यात आलेला नाही. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीकडे केल्या. कंपनीने त्याची दखल घेतली नाही व सर्व्हे झालेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे विमा कंपनीने फेटाळले आहेत. वास्तविक पाहता कृषी विभागाचे कर्मचारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी संयुक्तरीत्या झालेल्या नुकसानीचा सर्व्हेक्षण करणे अपेक्षित होते,

परंतु जिल्ह्यात असा कुठेही सर्व्हे झालेला नसल्याची बाब प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वच आमदारांनी खंतही व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारीची दखल पीकविमा कंपनीने घेतलेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी, पीकविमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक लावावी अशा सूचना दिलीप वळसे पाटील यांना जाधव यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT