HMPV First Case India agrowon
ॲग्रो विशेष

HMPV First Case India : भारतात आढळला 'एचएमपीव्ही'चा पहिला रुग्ण

Government Of India : सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. याचबरोबर कर्नाटक सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.

sandeep Shirguppe

Human Metaneumo : ह्यूमन मेटान्यूमो या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव चीनमध्ये होत असल्याचे सोशल मीडियाद्वारे पहायला मिळत आहे. दरम्यान, भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्ही विषाणूची लागण झाली आहे. या चिमुकलीची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती एका खासगी रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

बंगळुरू आरोग्य विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी रुग्णालयाने चाचणी केली यामध्ये ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाल्याचे समजले. मात्र, सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. याचबरोबर कर्नाटक सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. 'विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या अधिक्षक डॉ. वंदना बग्गा यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही बोलवली आहे.

केंद्र सरकारकडून निवेदन

चीमध्ये वाढत असलेल्या रोगाबाबत केंद्र सरकारकडून (ता.०४) जानेवारीला संयुक्त देखरेख विभागाची बैठक घेण्यात आली. केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, 'श्वासोच्छवासाच्या आजारांच्या कोणत्याही वाढीला सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे.

RSV आणि HMPV हे सामान्य इन्फ्लूएंझा विषाणू आहेत, ज्यामुळे चीनमध्ये फ्लूचे प्रमाण वाढत आहे. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच, WHO ला चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अपडेट देण्यास सांगितले आहे'. असे निवेदन केंद्राकडून जाहीर करण्यात आले आहे.

ह्यूमन मेटान्यूमोची ही आहेत लक्षणे

फ्लू, खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्‍वास घ्यायला त्रास होणे, ही एचएमपीव्हीचं सामान्य लक्षणे आहेत. गंभीर स्थितीमध्ये या विषाणूमुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार उद्‍भवण्याची शक्यता आहे. संसर्गानंतर तीन ते सहा दिवसांनी याची लक्षणे आढळून येतात, संसर्गाच्या प्रमाणानुसार आजाराचा कालावधी वेगवेगळा असू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT