Hivre Bajar Agrowon
ॲग्रो विशेष

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

Hivre Bajar Model Implemented : जलसंधारण, लोकसहभागातून जगापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श गाव हिवरे बाजार येथे राबविलेल्या विविध उपक्रमांचे मॉडेल नेपाळमध्ये राबविले जाणार आहे.

Team Agrowon

Nagar News : जलसंधारण, लोकसहभागातून जगापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श गाव हिवरे बाजार येथे राबविलेल्या विविध उपक्रमांचे मॉडेल नेपाळमध्ये राबविले जाणार आहे. नेपाळमधील विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी हिवरे बाजारला भेट दिली. पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी येथील मॉडेल नेपाळमध्ये राबवणार असल्याचे स्पष्ट केले.

नेपाळमधील मंत्रालयातील पाणीपुरवठा व जलसंधारण विभाग, नेपाळ सरकार व जलशक्ती मंत्रालय, जल संसाधन, नदी विकास, केंद्रीय जल आयोग, राष्ट्रीय जल अकादमी भारत सरकारतर्फे सुमारे २६ पेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली. येथे केलेल्या कामाची, गावांत लोकसहभाग व अन्य बाबींतून राबविलेल्या उपक्रमांची पाहणी केली. पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार गावातील संपूर्ण विकास कामांची माहिती दिली.

नेपाळमध्ये १२०० मिलिमीटर पाऊस पडूनसुद्धा पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याउलट हिवरे बाजारमध्ये ४०० मिलिमीटर पाऊस पडतो तरीसुद्धा लोकसहभागातून पाणी व्यवस्थापनामुळे पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे हिवरे बाजाराचा अनुभव नक्कीच उपयोगात येईल, असे नेपाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी मिलिंद पानपाटील, हबीब सय्यद, प्रसन्न पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

नेपाळ व हिवरे बाजारच्या भौगोलिक रचनेत बदल आहे. परंतु हिवरेबाजारने लोकसहभागातून पीक व पाणी व्यवस्थापन केल्यामुळेच यश मिळाले. भविष्यकाळात पाणी व अन्नाची गरज आहे. यापुढे हिवरेबाजारने राबविलेले उपक्रम नेपााळमध्ये पाहायला मिळतील.
रमेशकुमार, वरिष्ठ अधिकारी, नेपाळ सरकार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT