Hirda Tree Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Tree : हिरडा झाडांची सात-बारा उताऱ्यावर होणार नोंद

Record on 7/12 : शेतकऱ्यांनी आपल्या खासगी क्षेत्रातील हिरडा झाडाची नोंद आपल्या सात-बारा उताऱ्यावर करण्यासाठी लेखी अर्जाद्वारे मागणी केली आहे.

Team Agrowon

Pune News : आंबेगाव तालुक्यातील तळेघर परिसरातील सुमारे ४०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपल्या खासगी क्षेत्रातील हिरडा झाडाची नोंद आपल्या सात-बारा उताऱ्यावर करण्यासाठी लेखी अर्जाद्वारे मागणी केली आहे.

त्याची दखल घेत तहसीलदार संजय नागटिळक यांनी खासगी क्षेत्रातील हिरडा झाडांची नोंद संबंधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर करण्यात येईल, असे आश्वासित केले असून तशा सूचना आदिवासी भागातील तलाठ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती किसान सभेचे पुणे जिल्हा सहसचिव अशोक पेकारी यांनी दिली.

किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी आंबेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निवेदन किसानसभेच्या वतीने देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी यांच्या मंचर येथील कार्यालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी तहसीलदार संजय नागटिळक, किसान सभेचे पुणे जिल्हा सहसचिव अशोक पेकारी, कृष्ण वडेकर, अशोक जोशी, रामदास लोहकरे, राजू लोहकरे, मच्छिन्द्र वाघमारे, अशोक असवले आदी उपस्थित होते.

श्री. पेकारी म्हणाले, की हिरडा झाडाची नोंद आपल्या सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी सुमारे ४०० पेक्षा अधिक हिरडा उत्पादक शेतकरी हे नुकतेच तळेघर येथे जमा झाले होते. त्यांनी आपले लेखी म्हणणे गावकामगार तलाठी विशाल गारे यांना सादर केले होते. या वेळी तलाठी यांनी तहसीलदार यांच्या सूचनेनुसार हे अर्ज स्वीकारून त्याची पोहच दिली जाईल.

पुढील महिनाभरात सर्व हिरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिरडा झाडांची नोंद त्यांच्या सात-बारा उताऱ्यावर केली जाईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी कोणत्या गटात किती हिरडा झाडे आहे याची जी माहिती दिली आहे. ती माहिती गावपातळीवर पीक पाहणी समितीच्या माध्यमातून तपासून ही नोंद केली जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT