Hingoli Farmers Protest agrowon
ॲग्रो विशेष

Hingoli Farmers Protest : हिंगोलीच्या शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन पोलिसांनी अडवले; शेतकरी भूमिकेवर ठाम

Waive Crop Insurance : जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही. तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

sandeep Shirguppe

Maharashtra Farmers Crop Loan : सरसकट कर्जमाफी, पीक विमा, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी यासाठी हिंगोली जिल्ह्यातील जवळपास ४० शेतकरी मंगळवारी(ता.११) हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून मुंबईकडे निघाले होते. हिंगोली जिल्ह्यातून अर्धनग्न आंदोलन करत मंत्रालयाकडे जात असलेल्या शेतकऱ्यांना रायगड कर्जत येथे(ता.१२) मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

११ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता नामदेव पतंगे व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. यानंतर मंगळवारी (ता.११) दुपारी चार वाजता सर्व शेतकरी मुंबईकडे रवाना झाले. या सर्व आंदोलक शेतकऱ्यांना कर्जत (जि. रायगड) येथे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत आपण मुंबईला जाऊ नका, असे पोलिसांनी सांगितले. परंतु जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही. तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

यावेळी आंदोलक शेतकरी नामदेव पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "१२ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आम्हाला थांबून घेतले असले तरी आम्ही घाबरणार नाहीत. आमचे आंदोलन यापुढेही सुरूच राहील, हिंगोली पासून मुंबईकडे निघालेले आंदोलक शेतकऱ्यांच्या मागावर गोरेगाव पोलीसही आहेत. जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून सरकारकडे जाणे गुन्हा आहे का ? आमच्याकडे कुठले शस्त्र नाही, अंगावर पूर्ण कपडे नाहीत. लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी मागावर राहत ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याचे प्रकार होत असतील तर चुकीचे आहे. असे आंदोलक शेतकरी म्हणाले.

यापेक्षा मोठं आंदोलन करणार

सरसकट कर्ज माफी, पीक विमा, सोयाबीन कापसाला अनुदान, वन्य प्राण्याचा बंदोबस्त, पीक विम्यासाठी सिबिलची अट रद्द करा, या सह इतर प्रमुख मागण्यांसाठी हे शेतकरी मंत्रालयावर चालतं निघाले असून, सरकारने याबाबत गंभीर दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला यापेक्षा मोठे आंदोलन करावे लागेल असा इशारा अन्य शेतकऱ्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT