Milk Price Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Producers Agitation : दूध उत्पादक करणार महामार्ग ‘मेगा ब्लॉक’ आंदोलन

Highway Mega Block Protest : दुधाला प्रतिलिटर ४० रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे कोतुळ (ता. अकोले) येथे २६ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे.

Team Agrowon

Nagar News : दुधाला प्रतिलिटर ४० रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे कोतुळ (ता. अकोले) येथे २६ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर दुग्धविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संघर्ष समितीची संगमनेरला बैठक झाली. मात्र दुग्धविकास विभागाकडून आलेल्या लेखी आश्वासनाने समितीचे समाधान झाले नाही. त्यामुळे समितीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून आता दूध उत्पादक शेतकरी महामार्ग मेगा ब्लॉक आंदोलन करणार असल्याचे समितीचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर मिळावा यासाठी दूध उत्पादक संघर्ष समितीने गेल्या ४० दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू केले आहे. कोतुळ (ता. अकोले) येथे २६ दिवसांपासून संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनीही आंदोलन सुरू ठेवले आहे. कोथरूड ते संगमनेर ट्रॅक्टर रॅली काढली होती. संगमनेर येथील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर शेण ओतून शासनाच्या भूमिकेचा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निषेध केला.

त्यानंतर संगमनेर येथे दुग्धविकास आयुक्तांसह दुग्धविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागण्यांसंदर्भात बैठक झाली. यात झालेल्या चर्चेबाबत कोतुळ येथील आंदोलनस्थळी माहिती देण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत शासनाकडून तसेच अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दूध उत्पादकांच्या फसवणुकीचा अनुभव पाहता संबंधित विभागाकडून लेखी आश्‍वासन आल्याशिवाय आणि ते समाधानातकारक असल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतला होता.

दुग्धविकास विभागाकडून त्यासंदर्भात लेखी आलेले आहे, मात्र त्यात दुधाला दीर्घकाळ ४० रुपये दर कसा देता येईल याबाबत पुरेशी स्पष्टता दिसत नाही. निवडणुकीच्या तोंडावर अनुदान दिले जाईल. तोवर दर पडणार नाहीत याची काळजीही घेतली जाईल, मात्र निवडणूक झाल्यानंतर काय पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती निर्माण होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे दीर्घकाळ उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्याबद्दल जोवर धोरण घेतले जात नाही, तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व कोतुळ येथील आंदोलकांनी केला.

‘चार दिवसांत ठोस निर्णय घ्यावा’

सरकार हे सर्व प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरत असल्याचे हे ध्योतक आहे. या पार्श्‍वभूमीवर आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेता येणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत, चार दिवसांत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा महामार्ग रोखत शेतकरी ‘मेगाब्लॉक’ आंदोलन सुरू करतील, असा इशारा डॉ. अजित नवले यांच्यासह सदाशिव साबळे, विनोद देशमुख, नामदेव साबळे, अभिजीत ऊर्फ बबलू देशमुख, भाऊसाहेब देशमुख, प्रकाश देशमुख, अभि देशमुख, वैभव देशमुख, चेतन साबळे, बाळासाहेब गीते, भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, भाऊसाहेब पोखरकर, योगेश देशमुख, ज्ञानेश्वर डेरे, राजेंद्र सकाहरी देशमुख, अमोल तानाजी देशमुख, गौतम रोकडे, दत्ता ढगे, रवी पवार, भारत गोरडे, यांच्यासह दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT