Farmer Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Agitation : सोयाबीन दरासाठी औशात रोखला महामार्ग

Farmer Demands : सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेआठ हजार रुपये हमीभाव व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून छावाचे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील हे बेमुदत उपोषण करीत आहेत.

Team Agrowon

Latur News : सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेआठ हजार रुपये हमीभाव व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून छावाचे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील हे बेमुदत उपोषण करीत आहेत.

त्यांच्या उपोषणाला समर्थन देऊन सरकारला जागे आणण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २५) औशात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ एक तासाहून अधिक काळ रोखून धरला. तर संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर टायर पेटवून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तत्काळ पाणी ओतून पेटलेले टायर विझविले.

दरम्यान, १८ सप्टेंबरपासून शेतकरी नेते घाडगे यांचे औशाच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध संघटना, शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी घाडगे यांना समर्थन देण्यासाठी महामार्ग रोखून धरला.

या आंदोलनात माजी आमदार दिनकर माने, राज्य बाजार समितीचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी, राजकुमार सस्तापुरे, श्रीपती काकडे, शाम भोसले, रशीद शेख, सुभाष पवार, योगीराज पाटील, विद्या पाटील, जयश्री उटगे, पप्पू कुलकर्णी, संगीता लातूरकर, सई गोरे, राजेंद्र मोरे, राजू कसबे, भगवान माकणे, अमर बिराजदार आदी उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT