Satara Crop Insurance agrowon
ॲग्रो विशेष

Satara Crop Insurance : सातारा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक पीक विमा भरपाई

Crop Insurance Scheme : सातारा जिल्ह्यातील दोन लाख २७ हजार शेतकऱ्यांना तब्बल ११५ कोटी रुपये भरपाई मिळाली आहे.

sandeep Shirguppe

Crop Insurance Scheme Satara : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक नुकसान भरपाई विमा रक्कम यावर्षी मिळाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन लाख २७ हजार शेतकऱ्यांना तब्बल ११५ कोटी रुपये भरपाई मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांत प्रथम इतक्या मोठ्या प्रमाणात पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नव्‍हती. विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

कृषी अधिकारी फरांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीक विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्‍त असून, शेतीचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळावे, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा घ्यावा. त्यासाठी १५ जुलैपर्यंत एक रुपयात पीक विमा हप्ता भरावा असे आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान सातारा जिल्ह्यात मागील वर्षी खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिकांची उगवण चांगली न होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते, तसेच सरकारनेही पावसाचे अल्प प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती.

शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होऊन एक रुपयात विमा मिळविण्याचे आवाहन शासन व कृषी विभागाने केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने एक रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता. तब्बल दोन लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता.

खरीप हंगामात अल्प पावसामुळे काही ठिकाणी पिकांची उगवण झाली नाही, तर काही ठिकाणी पिकांना अपेक्षित उत्पन्नच मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती.

त्यामध्ये जिल्ह्यातील दोन लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली होती. त्या पैकी दोन लाख २७ हजार शेतकऱ्यांना आता भरपाईची रक्कम खात्यावर जमा होत आहे. जिल्ह्याला या भरपाई रकमेतून तब्बल ११५ कोटी रुपये मिळाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT