Police Helpline Agrowon
ॲग्रो विशेष

Police Helpline : संकटात नागरिकांना हेल्पलाईनचा आधार

जिल्ह्यातील पोलिस नियंत्रण कक्षामध्ये १०० क्रमांकाचा हेल्पलाईन नंबर होता.

Team Agrowon

Alibag News : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदतीचा हात मिळावा, यासाठी पोलिस दलात (Police Force) आधुनिकतेचा आधार घेत ११२ क्रमांकांचा हेल्पलाईन नंबर (Police Helpline number) सुरू केला आहे.

या हेल्पलाईनच्या (Police Helpline) नंबरवर कॉल आल्यापासून संबंधित नागरिकांना योग्य मदत मिळेपर्यंत फीडबॅक घेतला जातो. रायगड जिल्ह्यात सहा हजार ५९१ नागरिकांना या हेल्पलाईन क्रमांकाचा आधार मिळाला आहे.

पूर्वी जिल्ह्यातील पोलिस नियंत्रण कक्षामध्ये १०० क्रमांकाचा हेल्पलाईन नंबर होता. त्या नंबरवर फोन आल्यावर त्वरित प्रतिसाद देणे काही पोलिसांना शक्य नव्हते. तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीचे ठिकाणही समजत नव्हते.

त्यामुळे अनेक वेळा पोलिस मदतीला वेळेवर धावून येत नसल्याची ओरड कायमच राहिली आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारने १०० नंबरच्या जागी ११२ क्रमांकाचा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे.

या नंबरवर संकटग्रस्त व्यक्तीने फोन केल्यावर तो ज्या ठिकाणी आहे, त्या परिसराची माहिती लोकेशनद्वारे पोलिसांना मिळते. कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना आहे, याची माहितीही काही मिनिटात प्राप्त होते.

तसेच कॉल करणारा व्यक्ती कोण आहे, याचीही माहिती मिळते. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना तत्काळ ही माहिती दिली जाते.

मदत करताना पोलिस ठाण्यांच्या हद्दीचा अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जाते. संबंधित नियंत्रण कक्षातून त्या व्यक्तीच्या जवळपास असणाऱ्या पोलिसांशी संपर्क साधून मदतीसाठी पाचारण करण्यास सांगण्यात येते.

ही सर्व प्रक्रिया अत्यंत कमी कालावधीत पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मदत मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून 'फिडबॅक'ही घेतला जातो.

रायगड जिल्ह्यातील सहा हजार ५९१ नागरिकांनी ११२ या हेल्पलाईनवर कॉल केला आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधिताला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही हेल्पलाईन जिल्ह्यातील साडेसहा हजार नागरिकांसाठी आधार ठरली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diesel Sales Restriction: दर दिवशी मिळणार २०० लिटरच डिझेल: केंद्र सरकारचा निर्णय

Horticulture Production: फलोत्पादनाचा उच्चांक

Maharashtra Dairy Sector: गोरस भंडार संकटावर तोडगा; दूध उत्पादकांनी उभारली पर्यायी वितरण व्यवस्था

Onion Procurement Falters: नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी अवघी १०० टन

Farm Loan Waiver: चाळीस लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT