Monsoon Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Mrig nakshatra Rain : पाचोड परिसरात वीस दिवसांनंतर पावसाची जोरदार हजेरी

Rain Update : वीस दिवसांपूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाने परिसराला चांगलेच झोपडून काढल्यानंतर कायमचीच उघडीप दिली.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : वीस दिवसांपूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर कायमचीच उघडीप दिली. मात्र शनिवारी (ता. ७) दुपारी मृग नक्षत्रात पावसाने जोमदार हजेरी लावल्याने पाचोड (ता. पैठण) परिसरात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन सकाळपासून खरिपाच्या पेरणीसाठी शेतावर गेलेले शेतकरी पावसामुळे वाफसा मोडल्याने आपल्या लवाजम्यासह घरी परतले.

वीस दिवसांपूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाने परिसराला चांगलेच झोपडून काढल्यानंतर कायमचीच उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृगाच्या आगमनापूर्वी मशागती आटोपल्या व पावसाचे संकेत मिळताच शुक्रवारपासून (ता. ६) काही अपवाद वगळता सर्वत्र खरीप पेरण्यास प्रारंभ होऊन बी-बियाण्यांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी होऊन शेत-शिवारही शेजमजुरांच्या गर्दीने गजबजून गेल्याचे चित्र पाहवयास मिळाले.

बी-बियाण्यांची दुकाने खते व बियाण्यांनी भरली असली तरी, पावसाअभावी दुकाने ओस पडली होती. मृग नक्षत्रात दुपारी पेरणीयोग्य पावसाने प्रथमच हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरणीचे भंगणारे स्वप्न आटोक्यात आले. मृगाच्या पावसापूर्वीच परिसरातील शेतकऱ्यांनी धूळ पेरणीसाठी जुळवाजुळव करून पेरणीस सुरुवात केली.

एकंदरीत पावसाअभावी पेरण्या खोळंबून शेतशिवार ओस पडले होते, ते दोन दिवसांपासून गजबजल्याचे पाहवयास मिळाले. सकाळी उत्साहाने शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी जमवाजमव करून शेती अवजारे, बियाणे, मजूर घेऊन ते पेरण्यासाठी शेतावर गेले. पेरणी सुरू होऊन पाटाभर रान होत नाही, तोच दुपारी पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली.

त्यामुळे वाफसा मोडल्याने शेतावर गेलेले शेतकरी फौजफाट्यासह घरी, गावाकडे परतले. सर्वत्र शेतातून पाणी बाहेर निघाले, काही नद्या, रस्त्याने पाणी प्रवाहित झाले. या पावसामुळे सर्वत्र आशा पल्लवित झाल्या असून आता पावसाने उघडीप दिली तर वेळेवर खरिपाच्या पेरण्या होतील, अन्यथा पावसाने आपला जोर कायमच ठेवला, तर खरिपाच्या पेरण्याची वेळ निघून जाईल. अधिक पाऊस आला तर खरिपाच्या पेरण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे, शेतकरी शिवाजी पा. भुमरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Viral Video : राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी

Onion Procurement Scam : कांदा खरेदी केंद्रांवर नियंत्रणासाठी राज्य सरकारची दक्षता समिती

Urea Shortage : युरियाची खानदेशात टंचाई

Maharashtra Assembly Session : बोजाखाली दबलेल्या सरकारची सुटका

MGNREGA Scam : मजुरांच्या खात्यात पैसे टाकणारे चौघे अटकेत

SCROLL FOR NEXT