Kolhapur Rice Production agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rice Production : भाताचे दाणेच भरले नाहीत, अतिपावसाने कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात भाताचे उत्पादन घटलं

Heavy rains Crop Damage : कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या अवकाळी पावसाने फुलोऱ्यात आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले.

sandeep Shirguppe

Kolhapur Agriculture news : कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या अवकाळी पावसाने फुलोऱ्यात आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक चंदगड तालुक्यात भात पीक उत्पादन घेतले जाते. मात्र पुरेशा प्रमाणात दाणे न भरल्यामुळे उत्पादन घटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात सरासरी प्रतिगुंठा ७० किलो, तर पूर्व भागात ८० किलो उत्पादन होते. दैनंदिन खाद्यान्नातील प्रमुख धान्य असल्याने ऊस पिकापाठोपाठ भाताचे उत्पादन होते. १२० ते १५० दिवसांत ते परिपक्व होऊन कापणीला येते. या वर्षी सुरुवातीपासूनच पिकासाठी पोषक वातावरण होते.

मुसळधार पावसाने पीक जोमात आले. फुलोराही मोठ्या प्रमाणात आला. मात्र, श्रावण महिन्यात उघडीप मिळाली नाही. जोरदार पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे फुलोऱ्याचे परागीभवन होण्यात अडथळा आला. त्यामुळे लोंबे जोमदार दिसत असूनही दाणे भरण्याचे प्रमाण कमी झाले.

सुमारे वीस टक्के चिंब धरल्याने तेवढ्या पटीत उत्पादनात घट आली. मधल्या काळात भातावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जागोजागी पीक मृतावस्थेत गेले. त्यामुळे पिंजराचे प्रमाणही कमी झाले. भात आणि पिंजर या दोन्हीत घट झाल्याने शेतकऱ्याला त्याचा मोठा फटका बसला आहे.

चंदगड तालुक्यात सुमारे १४ हजार हेक्टरवर भाताचे पीक घेतले जाते. अति पावसाच्या पश्चिम भागात रोप लावण यावर्षी पीक चांगले आले होते. मात्र, गणेश चतुर्थीत मोठ्या पावसाने फुलोऱ्यावर परिणाम झाला. परिणामी चिंबाचे प्रमाण वाढल्यामुळे उत्पादनात घट जाणवत असल्याचे ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’

Agricultural Products GI Tag: ‘नाबार्ड’मुळे १७६ उत्पादनांवर ‘जीआय’ मानांकनाची मोहोर

SCROLL FOR NEXT