Sindhudurg Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Heavy Rain: मॉन्सून आगमनानंतर सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

Monsoon Rain Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या सर्व भागांत पावसाचा जोर असून नदीनाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या सर्व भागांत पावसाचा जोर असून नदीनाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

काही ठिकाणी पडझडीचे प्रकार देखील झाले आहेत. सिंधुदुर्गात रविवारी मॉन्सून दाखल झाला. मॉन्सून दाखल होताच सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. 

तालुकानिहाय पाऊस :

दोडामार्ग तालुक्यात - ६६ मिमी, सावंतवाडी - ४९, वेंगुर्ला - ३९, कुडाळ - ७४, मालवण - ४३, कणकवली - ६९, देवगड - ५८ आणि वैभववाडी तालुक्यात ६८ मिमी पाऊस पडला.

रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर रात्रभर पाऊस कायम होता. सोमवारी (ता. २६) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

पावसामुळे देवगड तालुक्यातील आरे बौद्धवाडी येथे घरावर झाड कोसळून ५० हजारांचे नुकसान झाले. पावसामुळे जिल्ह्यात महावितरणची मोठी पडझड झाली आहे. आतापर्यंत ३९ लाखांचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT