Rain Crop Loss Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Monsoon Rain: नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान

Rain Crop Damage: वादळी वाऱ्यांसह आठवडाभर सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने नाशिक जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले असून, १५ हजार शेतकरी प्रभावित झाले आहेत.

Team Agrowon

Nashik News: वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात मोठी दाणादाण उडवली आहे. दररोज दुपारनंतर हा पाऊस थैमान घालत असून, जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे. त्यामध्ये जवळपास पंधरा हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

पाच मे रोजी पावसाला सुरुवात झाल्यानंतर दररोज पावसाची हजेरी आहे.वादळी वाऱ्यासह जिल्हाभरात सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात नुकसान झाले असून, कांदा, आंबा, डाळिंब पिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला लागवडी खराब झाल्या आहेत.

सोमवारी जिल्हाभरात २५ गावांतील ६०० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने कळविले आहे. यात सर्वाधिक सटाणा तालुक्यात १३ गावांमध्ये नुकसान आहे. इगतपुरीमध्ये ६, तर चांदवडला ४ गावांत, तर सिन्नर व देवळा येथे प्रत्येकी एका गावात नुकसान झाले आहे.

अंतापूर परिसराची आमदार बोरसे यांच्याकडून पाहणी

बागलाण आदिवासी पश्‍चिम परिसरासह मोसम, तुंगाडी, करंजाडी व सोळागाव काटवन परिसरांत सलग पाचव्या दिवशी पाऊस झाल्यामुळे कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले. आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने संबंधित विभागास पंचनामा करण्याचे आदेश दिले.

सुरुवातीला कांद्याचे बियाणे खराब झाल्याने ते पुन्हा नवीन टाकल्याने या हंगामातील कांदा काढणीस उशीर झाला होता. त्यात मजूरटंचाई व वादळी पावसामुळे परिसरातील कांदा पिकाचे नुकसान झाले. शासकीय यंत्रणांकडून पंचनामे सुरू असले तरीही त्यास अपेक्षित गती नसल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT