Kerala Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Kerala Rainfall: केरळमध्ये मुसळधार पाऊस; दरड कोसळण्याचा धोका

Rain Alert: गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वायनाडमधील मुंडक्काई-चुरालमळा परिसरात पूरस्थितीचा धोका असून, दरड कोसळण्याचीही भीती आहे. या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Waynad News: गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वायनाडमधील मुंडक्काई-चुरालमळा परिसरात पूरस्थितीचा धोका असून, दरड कोसळण्याचीही भीती आहे. या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. वायनाडमध्ये वर्षभरापूर्वी दरड कोसळून २०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.

बुधवारी जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चुरालमळा नदीला जोरदार पूर आलेला असून नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून, अनेक भागांतून नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, डोंगरावर, विशेषतः जंगलातील पुंचिरिमट्टमजवळच्या उंच भागात नव्या दरडी कोसळल्याची शक्यता आहे.

मात्र, अधिकाऱ्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलामध्ये कोणत्याही भागात दरड कोसळल्याची आम्हाला माहिती नाही. मात्र, आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत.

बाणासुरा धरण जवळपास पूर्ण क्षमतेपर्यंत भरत आल्यामुळे परिसरात ‘रेड ॲलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने वायनाडसह ११ जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज ॲलर्ट’ जारी केला असून, पुढील काही दिवस तेथे पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Talathi Recruitment 2026: तलाठी भरतीत कोतवालांना प्राधान्य, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

Native Seed Conservation: देशी वाणांच्या थेट विक्रीतून उभारले अर्थकारण

El Nino Impact: जागतिक शेतीमाल बाजाराला दुहेरी झटका

Fertilizer Black Marketing : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात १.६९ लाख धाडी; महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई, लोकसभेत सरकारची माहिती

Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT