Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी

Pune Rain Update : गेल्या आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत.

Team Agrowon

Pune News : गेल्या आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. गुरुवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत इंदापुरातील सणसर आणि बारामती येथे सर्वाधिक ८१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

उत्तरेकडे मॉन्सून सरकत असताना जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतात वाफसा स्थिती येऊ लागली आहे. परंतु शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड भागांत पावसाच्या अजूनही जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळी काही प्रमाणात ऊन पडत असले तरी दुपारनंतर वातावरणात वेगाने बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

सायंकाळनंतर अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. शिरूरमधील वडगाव येथे १३.८ मिलिमीटर, न्हावरा १३.८, रांजणगाव २४.८ मिलिमीटर पाऊस पडला असून मलठण, तळेगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर, टाकळी भागांत तुरळक सरी पडल्या.

बारामतीतील माळेगाव ४०.८, पणदरे २०.३, सुपा १३, उंडवडी ४०.३ मिलिमीटर तर वडगाव, लोणी, मोरगाव भागांत हलका पाऊस पडला. इंदापुरातील भिगवण २८.५, इंदापूर ११.०, लोणी ११.३, काटी २५.८, निमगाव २५.८ मिलिमीटर तर बावडा, अंथुर्णी पावसाच्या सरी पडल्या.

दौंडमधील देऊळगाव २२.३, पाटस ४९.८, केडगाव ११.०, राहू १०, वरवंड २२.५, रावणगाव ५०.५, दौंड ४४.५, खामगाव २४.३, पारगाव १३.८, बोरीपार्धी १४.३ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे उजनी धरणांत पाण्याची आवक सुरू झाली आहे.

गुरुवारी सकाळपासून काही प्रमाणात ऊन पडल्याने उकाडा तयार झाला होता. तर हवेली पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरुळीकांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली भागांत पावसाच्या तुरळक पाऊस पडला. तर काही भागात पावसाने उघडीप दिली होती.

मुळशीतील पौड, घोटावडे, थेरगाव, माले, मुठे, पिरंगुट, भोरमधील भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, मावळमधील वडगाव मावळ, तळेगाव, काले, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे, वेल्ह्यातील पानशेत, विंझर, आंबवणे, जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर, खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडुस, आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा भागात अधूनमधून सरी पडत होत्या. या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या कामांना सुरुवात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT