Heavy Rains Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यात वळीव पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा इशारा

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात रात्री नऊच्या सुमारास गडगडाटासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले.

sandeep Shirguppe

Rain In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात रात्री नऊच्या सुमारास गडगडाटासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. सध्या शाळू पिकाची कापणी सुरू आहे दरम्यान खुडणी करण्याआधीच पावसाने ज्वारीची कणसे पावसात भिजून गेली. भिजलेला शाळू काळपट पडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

काढणी, कापणी, मळणी झाल्यानंतर शेतात पडलेला सुका चारा कडबादेखील पावसात भिजून गेला. तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला होता.

गडहिग्लज, शिरोळ, हातकणंगले, करवीर, या तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये शिरोळ तालुक्यातील फळभाज्या आणि पालेभाज्या पिकांना मोठा फटका बसला तर काढणीला आलेल्या ज्वारी पीक भिजले. तर नांदणी, हेरवाड, तेरवाड, अकिवाट, हारोली यासह अन्य परिसरात भाजीपाला आणि फळभाज्या पिकांना पावसाने नुकसान झाले. तर हातकणंगले परिसरातील काही ठिकाणी गव्हाच्या मळणी सुरू आहेत अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तर काही शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

कागल तालुक्यात रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुरगूड येथील आठवडी बाजार होता. यामुळे शेतकरी, नागरिक, व्यापारी, भाजी विक्रेते यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर बाजारात पावसाने पाणी साचल्याने भाजीपाल्याचे नुकसान झाले. सेनापती कापशी परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर सायंकाळी ७ च्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि रात्री आठच्या सुमारास पाऊस झाला. बाळेघोल, तमनाकवाडा, माद्याळ, कासारी, करंजिवणे, बेनिक्रे, हमिदवाडा, लिंगनूर परिसरात सुमारे अर्धा तास पावसाने झोडपले. या भागातील उसाला पाण्याची आवश्यकता होती पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे.

हवेत काहीसा गारवा

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा जाणवत होत्या दरम्यान झालेल्या पावसाने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात काही दिवस कमाल तापमान ३६.९ अंशांवर व किमान तापमान तब्बल २५ अंशांवर होते. बुधवारी (ता.२६) तापमान तब्बल ३ अंशानी कमी झाले आहे. ग्रामीण भागात ऊस, मक्का, ज्वारी, भुईमूग या पिकासांठी हा पाऊस संजीवनी ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT