Kerala Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Kerala Heavy Rain: केरळमध्ये मुसळधार पावसाने कहर सुरूच

Kerala Flood News: केरळच्या वायनाड, कोझिकोड, पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यांत संततधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. अनेक नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले असून, एनडीआरएफचे पथक कामाला लागले आहे.

Team Agrowon

Thiruvananthapuram News : केरळच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. नागरिकांना मदत छावण्यांमध्ये आणि सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक जिल्ह्यांमधील नद्यांच्या पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस सुरू असल्याने, वायनाडच्या सुलतान बाथेरी येथील पुझमकुनी गावातील अनेक आदिवासी कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले, असे जिल्हा अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले. बाथेरीमध्ये मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत आणि एनडीआरएफ टीम जिल्ह्यात तळ ठोकून आहे, असेही त्यांनी सांगितले.

जोरदार वारे आणि संततधार पावसामुळे पलक्कड जिल्ह्यातील उंच पर्वतरांगांमध्ये, ज्यामध्ये अट्टप्पाडी आणि नेल्लियमपथी भागांचा समावेश आहे, जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोझिकोड जिल्ह्यातील अनेक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. कोझिकोड जिल्हा अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. केरळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) कोरापुझा (कोझिकोड), मनिमाला नदी (पठाणमथिट्टा), वामनपुरम (तिरुवनंतपुरम) आणि कबानी नदी (वायनाड) या किनाऱ्यांवर राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

बोट उलटून १५ पर्यटकांचा मृत्यू

केरळच्या मलप्पुरममध्ये रविवारी रात्री डबलडेकर बोट उलटून १५ पर्यटकांचा मृत्यू झाला. या बोटीत सुमारे ४० पर्यटक होते. तनूरजवळ हा अपघात झाला. बचावकार्य सुरू आहे. थुवल थेराम पर्यटनस्थळी पुरपुझा नदीत सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये ६ मुले आणि ४ महिलांचा समावेश आहे.

सुमारे १० जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोटमधील प्रवाशांची संख्या बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १० प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तसेच या बोटीवर पुरेशी जीवरक्षक उपकरणेही नव्हती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Session 2026: पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून, कामकाज ३ आठवडे चालणार

Organic Fertilizer: शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवा : सुधीर शिंदे

Soil Health: जमिनीच्या गुणधर्मानुसार खतांची योग्य निवड कशी करावी?

Panchayat Samruddha Abhiyan: पंचायत समृद्ध अभियानांतर्गत १८ ग्रामपंचायतींचे मूल्यांकन पूर्ण

Agrowon Podcast: हरभरा भाव टिकून; सोयाबीन स्थिर, कांद्यात चढ उतार, शेवगा नरमला, तर पपईला उठाव

SCROLL FOR NEXT