Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain : नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात पश्चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रामुख्याने इगतपुरी, सुरगाणा, त्रंबकेश्वर व पेठ तालुक्यांत पावसाचा जोर दिसून आला. गेल्या सप्ताहापासून इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर दिसून आला आहे. तालुक्यातील भावली धरण भरले तर यंदा पश्चिम पट्ट्यातील सर्वांत मोठ्या दारणा धरणात पाण्याचा येवा वाढल्याने दारणा धरणातून गुरुवारी (ता. २५) सायंकाळी ५ वाजता ११,९४६ क्युसेक विसर्ग नांदूर-मधमेश्वरकडे सोडण्यात आला आहे.

पावसाचा जोर अधिक असल्याने इगतपुरी तालुक्यात गुरुवारी (ता. २५) सकाळी १० पर्यंत गेल्या २४ तासांत ६७.६ मिमी पावसाची नोंद झाली. दारणा, वाकी, भाम या नद्या खळखळून प्रवाहित झाल्या आहेत. पेठ तालुक्यात ७८.७ मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक १०१ मिमी पावसाची नोंद झाली. सुरगाणा तालुक्यात ७०.८ मिमी पावसाची नोंद झाली.

पावसाचा जोर असल्याने दारणा धरणातून बुधवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता १,१०० नंतर दुपारी १८७४ असा विसर्ग वढवून तो गुरुवारी (ता. २५) ११,९४६ करण्यात आला. तर भावली धरण १०० टक्के तुडुंब भरले यामुळे ८२२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. इगतपुरी घोटीसह मानवेडे, वैतरणा, धारगाव, टाकेद या भागांत आठ दिवसांपासून पावसाचे सातत्य राहीले.

भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या कडून प्राप्त प्रभावा आधारित अंदाजानुसार शुक्रवारी(ता. २६) नाशिक जिल्ह्यातील घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस तसेच मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र इगतपुरी यांच्याकडून देण्यात आली.

येथे झाली अतिवृष्टीची नोंद : कंसात पाऊस मिमीमध्ये

सुरगाणा (९६.८)

उंबरठाणा (९६.८)

ननाशी (१००)

इगतपुरी (७३.५)

घोटी (७३.५)

धार गाव (११९.५)

पेठ (७७.५)

जोगमोडी (८३.८)

कोहोर (७६.८)

करंजाळी (७६.८)

त्र्यंबकेश्वर (६९)

वेळुंजे (१००.३)

हरसुल (८५.५)

ठाणापाडा (८५.५)

दहाडेवाडी (१६४.८)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT