Sindhudurg Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस

River Over flow: जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. वादळीवाऱ्यामुळे काही घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. दरम्यान, कणकवली आणि वैभववाडी तालुक्याला पावसाने झोडपून काढले.

Team Agrowon

Sindhudurg News: जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. वादळीवाऱ्यामुळे काही घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. दरम्यान, कणकवली आणि वैभववाडी तालुक्याला पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे या भागातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत

जिल्हयात काल पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे.सकाळपासूनच पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या.दुपारनंतर पावसाचा वाढला.कणकवली आणि वैभववाडी तालुक्याला झोडपून काढले.दोनही तालुक्यात रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता.

या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील शुक,शांती,करूळ,कुसुर,अरूणा या सर्व नद्यां दुथडी भरून वाहत होत्या.याशिवाय कणकवली तालुक्यातील गड आणि जानवली नद्यांच्या पाणपातळीत वाढ झाली होती.

कुडाळ,सावंतवाडी तालुक्यात देखील पावसाचा जोर होता. पावसामुळे काही ठिकाणी पडझडीचे प्रकार देखील झाले आहे.वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील नळपाणी पुरवठा योजनेची मुख्य विहीर पावसामुळे कोसळली.

या विहीरीवर मातोंड आणि सातवायगंणी गावातील २५० कुटुंबे अवलंबून आहेत.वैभववाडी तालुक्यातील एडगाव येथील एका घरावर मोठे झाड कोसळल्याने नुकसान झाले.सुदैवाने घरातील कुणालाही दुखापत झालेली नाही.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

वैभववाडी ः ८७, कणकवली ः ८०, सावंतवाडी ः ४७, कुडाळ ः ५५, वेंगुर्ला ः २०,मालवण ः १०, देवगड ः २९, दोडामार्ग ः २९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

Soil Mulching: जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन करताना काय काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT