Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Sindhudurg Rain News : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागाला रविवारी (ता. २०) मुसळधार पावसाने झोडपून काढले.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागाला रविवारी (ता. २०) मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान भातपिकांचे नुकसान सुरूच आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरण बदलले आहे. सकाळच्या सत्रात कडक उन्ह तर दुपारनंतर पाऊस असे चित्र आहे. रविवारी (ता. २०) सायकांळी उशिरा विजांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊसाला सुरूवात झाली.

अनेक भागांत विजांच्या गडगडाटाने परिसर हादरून गेला. दोडामार्ग, मालवण, वैभववाडी या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. काही भागांना तासभर पावसाने झोडपून काढले.

विजांच्या कडगडाटामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे भातपिकांचे नुकसान सुरूच आहे.

रविवारी (ता. २०) सकाळी अनेक शेतकऱ्यांनी भातपीक कापणी केली होती. परंतु पीक सुरक्षितस्थळी हलविताना शेतकऱ्यांची ताराबंळ उडाली. सोमवारी (ता. २१) सकाळी पावसाचे वातावरण होते. मात्र सकाळी दहानंतर कडक ऊन पडले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Processing Project: शेतकरी गटाचा धान पट्ट्यात टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प

Sugaracne Payment: लोकनेते देसाई कारखान्याकडून तीन हजारांची पहिली उचल

Human Wildlife Conflict: बिबट्याला मारायची परवानगी द्या

Yatra Management: कार्तिकी यात्रेदरम्यान मंदिर परिसरात वाहनांना बंदी

NCCF Transport Issue: ‘एनसीसीएफ’ वाहतूक निविदा प्रक्रियेत पक्षपात, अनियमिततेचे आरोप

SCROLL FOR NEXT