Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस

Rain Update : जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांत बुधवारी जोरदार पाऊस झाला. तसेच पश्‍चिमेकडील तालुक्यात संततधार पाऊस झाला.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांत बुधवारी जोरदार पाऊस झाला. तसेच पश्‍चिमेकडील तालुक्यात संततधार पाऊस झाला. जिल्ह्यात २४ तासांत २०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने उरमोडी, कण्हेर धरणातून गुरुवारी विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात पावसाने दमदार आगमन केले आहे. विशेष दुष्काळी तालुक्यांना झोडपून काढले आहे. माण, खटाव, फलटण तालुक्यांत अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. खटाव तालुक्यात मायणी येथे जोरदार पावसामुळे घरे, दुकानात पाणी शिरले होते. फलटण तालुक्यात अनेक भागांत दिवसभर संततधार पाऊस सुरू होता.

माण तालुक्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. या दुष्काळी तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांच्या अवस्था चांगल्या आहेत. मात्र पाऊस होत असल्याने कांदा, खरीप ज्वारी या पिकांचे नुकसान होणार आहे. पश्चिमेकडील जावळी, महाबळेश्वर तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले.

अनेक शेतात पाणी साचल्यामुळे स्ट्रॉबेरी लागवड व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. सातारा, कऱ्हाड, पाटण, वाई, खंडाळा तालक्यातही कमी अधिक स्वरूपात पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, भुईमूग या पिकांचे नुकसान होणार आहे.

सततच्या पावसामुळे हळद, आले पिकाचे नुकसान सुरू आहे. आले पिकास कंदकुजीचे प्रमाण वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी उरमोडीतून २५०, कण्हेर धरणातून ६०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिमीमध्ये)

सातारा १५.४, जावळी ४३.३, पाटण २२.१, कऱ्हाड ८.७, कोरेगाव १७.३, खटाव १६.८, माण १७.४, फलटण २३.२, खंडाळा १२.९, वाई १५.३, महाबळेश्वर ८०.९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT