Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : कुडाळ, कणकवलीत जोरदार सरी

Heavy Rain : पावसामुळे कापणीला विलंब झालेले शेतकरी सध्या रात्रंदिवस भातपीक कापणीचे काम करीत आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील कुडाळ आणि कणकवली तालुक्यांच्या अनेक भागात सोमवारी (ता.२८) पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे कापणी केलेल्या भात उत्पादकांची चांगलीच धावपळ उडाली.

जिल्ह्याच्या उर्वरित भागात देखील हलक्या सरी झाल्या. मंगळवार सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात सध्या वेगाने भातपीक कापणी सुरू आहे. पावसामुळे कापणीला विलंब झालेले शेतकरी सध्या रात्रंदिवस भातपीक कापणीचे काम करीत आहेत.

दिवसभर पिकांची कापणी करायची आणि रात्री त्याची झोडणी अशा पद्धतीने सध्या काम सुरू आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे कापणीची गती देखील वाढली होती. दरम्यान, सोमवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती.

त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भातपिकाची कापणी केली होती. मात्र सायंकाळी चार वाजता अचानक पावसाचे वातावरण निर्माण झाले. कुडाळ तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली.

कुडाळ, कणकवली, सावंतवाडी तालुक्याच्या अनेक भागांत जोरदार सरी बरसल्या. याशिवाय मालवण, वेंगुर्ला, देवगड, वैभववाडी या तालुक्यांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या.

या पावसामुळे पिकाची कापणी केलेल्या शेतकऱ्यांची आवराआवर करताना चांगलीच तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांनी शेतमळ्यातच पिकांची बांधणी करून त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन करून ठेवले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’

Agricultural Products GI Tag: ‘नाबार्ड’मुळे १७६ उत्पादनांवर ‘जीआय’ मानांकनाची मोहोर

SCROLL FOR NEXT