Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : कोल्हापुरात जोरदार पाऊस

Rain News : शनिवारी सायंकाळनंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने ओढे नाले वाहत असल्याचे चित्र होते.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यात मॉन्सून पावसाने जोरदार सलामी दिली आहे. शनिवारी सायंकाळनंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने ओढे नाले वाहत असल्याचे चित्र होते. शनिवारी सायंकाळनंतर ‘रेड अलर्ट’ दिला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत सायंकाळनंतर मॉन्सून धुवाधार बरसला.

मुसळधार पावसाने कागल, गडहिंग्लज, इचलकरंजी आदी परिसरातील अनेक ओढे, नाले ‘ओव्हर फ्लो’ झाले. त्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते. काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. कागल तालुक्यातील बाळेघोल परिसरात पाण्यात ट्रॉली अडकली.

कडगाव (ता. गडहिंग्लज) येथेही ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करावी लागली. रविवारपासून जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात आजपासून अनेक भागांत दमदार पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

शहरासह जिल्ह्यात सकाळी वातावरण काहीसे निरभ्र होते. मात्र नंतर ते ढगाळ होते गेले. दुपारनंतर त्याची तीव्रता वाढत गेली. सायंकाळी अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसाने खरीप पेरणीपूर्व मशागती व खरीप पेरण्यांना गती येणार आहे. भुईमूग, नाचणी पिकक्षेत्रात पेरणीपूर्व मशागत कामे सुरू आहेत.

रविवारी मंडलामध्ये ६० मिमीपेक्षा जास्त पाऊस

रविवारी (ता. 9) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ८ मंडलांमध्ये ६० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. २१ मंडलांमध्ये ४० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे

पेरणी गेली वाहून

बहिरेवाडीत पेरण्या गेल्या वाहून बहिरेवाडी (ता. आजरा) येथे शनिवारी सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. सुमारे तीन तास पाऊस पडत होता. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात, सोयाबीन, भुईमूग पिकाच्या पेरण्या वाहून गेल्या. या वर्षी मॉन्सूनपूर्व वळीव पाऊस वेळेत दाखल झाला. पावसाने दमदार एन्ट्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

जमिनीत ओलावा येताच शेतकऱ्याने पेरणीला सुरुवात केली. काहींची पिकेसुद्धा जमिनीतून डोके बाहेर काढू लागली. मात्र शनिवारी अतिवृष्टी झाली. जवळपास तीन तास मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे पावसाने वाहून गेले. ज्या शेतातील बियाणे वाहून गेले, तेथे आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. याबाबत कृषी सहायक शिवाजी गडकरी व तलाठी एकनाथ मिसाळ यांनी पाहणी करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT