Rain News  Agrowon
ॲग्रो विशेष

Devani Rain Update : देवणी तालुक्यात मुसळधार पाऊस

Crop Damage : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून थांबलेला पाऊस रविवारी पहाटे सुरू झाला. तालुक्यातील सर्वच भागात झालेल्या मुसळधार पावसाने शेतशिवारातील पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Devani News : तालुक्यासह परिसरात रविवारी (ता. २०) पहाटे मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतशिवारातील काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून थांबलेला पाऊस रविवारी पहाटे सुरू झाला. तालुक्यातील सर्वच भागात झालेल्या मुसळधार पावसाने शेतशिवारातील पिकांचे नुकसान झाले आहे. दुपारपर्यंत थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने शेतशिवारात सर्वत्र पाणी दिसत होते.

रविवारी दुपारनंतर तालुक्यातील ग्रामीन भागात वाजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे रब्बी पेरण्या खोळबंल्या. सततच्या ओलाव्यामुळे तणांची वाढ जोमाने होत आहे.

त्यामुळे रब्बी पेरणीपूर्व मशागतीस अडथळा येत आहे. तणांची वाढ होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रविवारी झालेल्या पावसाने तालुक्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

तालुक्यात सोयाबीनची काढणी करून अनेक शेतकऱ्यांनी गंजी लावलेल्या आहेत. मात्र रविवारी झालेल्या पावसाने सोयाबीनच्या गंजीचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT