Satara Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Rain: सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Koyna Dam: जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. जावळी, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात अनेक भागांत पावसाच्या दमदार सरी कोसळत आहे. पूर्वेकडील दुष्काळी भागात तुरळक पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Satara News: जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. जावळी, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात अनेक भागांत पावसाच्या दमदार सरी कोसळत आहे. पूर्वेकडील दुष्काळी भागात तुरळक पाऊस  झाला आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी १६.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्‍ह्यात मागील चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता. पश्चिम भागात तुरळक पाऊस सुरू होता. मात्र सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिमेकडील सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्वर, कऱ्हाड, वाई तालुक्यांत अनेक ठिकाणी पावसाचा दमदार सरी येत आहे. जावळी, पाटण, महाबळेश्वर या तीन तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. पूर्वेकडील माण, खटाव फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. 

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रातील कोयना ११३, नवजा १२१, महाबळेश्वर ११० मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात प्रतिसेकंद २४,१४६ क्युसेक आवक होत आहे. धरणाच्या पायथा वीज गृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

कोयना धरणात मंगळवारी सकाळी आठ वाजता ३९.७१ टीएमसी (३७.७३ टक्के) पाणीसाठा झाला आहे. उरमोडी धरणातून दुपारी १२ वाजता ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.तर कण्हेर धरणातून २००० क्युसेकने वाढ करून दुपारी सव्वा बारा वाजता ३००० क्युसेकने नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदी पात्रात विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT