Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान

Unseasonal Rain Crop Loss : शिरोली दुमाला येथे वादळी वाऱ्यासह पावसाने २० हून अधिक घरांवरील पत्रे उडाले. यामध्ये शेती सेवा केंद्रातील रासायनिक खते व औषधे भिजून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यात मंगळवारी (ता.१) वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. हातकणंगले, करवीर, गडहिंग्लज, पन्हाळा, कागल, आजरा, राधानगरी, गगनबावडा परिसरांत वळीव आणि गारांचा पाऊस झाला. यात भाजीपाला पिकांचे नुकसान झाले, तर ऊस पिकाला काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे.

शिरोली दुमाला येथे वादळी वाऱ्यासह पावसाने २० हून अधिक घरांवरील पत्रे उडाले. यामध्ये शेती सेवा केंद्रातील रासायनिक खते व औषधे भिजून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. तर गावालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या घरावरील साठहून अधिक पत्रे उडाले. यामध्ये धान्य व प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

पन्हाळगडावर अचानक वळीव पावसाने हजेरी लावली. गारांचा पाऊस झाल्याने सूर्यफूल पिकाला फटका बसला, तर ऊस शेतीला काहीसा दिलासा मिळाला. आजरा तालुक्यात सायंकाळी सुमारे तासभर पाऊस पडत होता. काजू व ऊस पिकासाठी पाऊस चांगला झाल्याचे सांगण्यात येते.

राधानगरी तालुक्यात गारा आणि वादळामुळे ठिकठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असल्याने वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. उन्हाळी पिकांचे नुकसान होऊन सूर्यफुले कोलमडल्याचे प्रकार घडले आहेत.

अनेक ठिकाणी मका पिकाला या वाऱ्याचा मोठा फटका बसला. कागल तालुक्यात वादळी पावसाने हळदी, बेनिक्रे गावातील २५ हून अधिक घरावरील पत्रे, कौले उडून गेली. हळदी येथे घरे आणि शेड, गोठे यांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT