Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

Rain Update : या हंगामावर पावसाचे सावट घोंघावत आहे.जिल्हयात २१ एप्रिलपासून ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती.

Team Agrowon

Sindhudurg News : प्रचंड उकाडा वाढला असताना जिल्ह्यात अनेक भागांत मंगळवारी (ता.२२) रात्री विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. घाटपायथ्याच्या गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढणार आहे.

जिल्ह्यातील आंबा, काजू हंगाम सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. काजू हंगाम अतिंम टप्प्यात आहे तर पश्चिम पट्ट्यातील आंबा हंगाम बहरात आहे. पूर्व पट्ट्यातील आंबा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. या हंगामावर पावसाचे सावट घोंघावत आहे.जिल्हयात २१ एप्रिलपासून ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती.

सोमवारी रात्री सावंतवाडी तालुक्यातील काही गावांमध्ये हलक्या सरी झाल्या. त्यानंतर सोमवारी सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा होता. उष्णतेच्या ज्वाळांनी नागरिक घामाघूम होत असल्याचे चित्र होते. सायंकाळी चार-पाच वाजल्यानंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी तालुक्यात विजांचा लखलखाटांसह पावसाला सुरवात झाली.तासभर अधिक विजांचा कडकडाट सुरू होता. घाटपायथ्याच्या गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

सावंतवाडी, कणकवली, कुडाळ तालुक्यांच्या पूर्वपट्ट्यात देखील पावसाच्या हलक्या सरी झाल्या.या पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा हंगामासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन आंबा हंगामात पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने आंबा आणि काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT