Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : सिंधुदुर्गात २६ हेक्टरवर नुकसान

Heavy Rain Crop Loss : या पावसामुळे या परिसरातील आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सपुंष्टात आला. त्यानंतर १६ ते २७ मे या कालावधीत जिल्ह्याच्या सर्व भागांत जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात २१ मे ते २७ मे या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे ७४ गावांतील १७५ शेतकऱ्यांचे कोकम, कलिंगड, भुईमूग आणि चवळी या पिकांचे २६.४४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र पूर्वपट्ट्यातील आंबा आणि शेकडो एकरवरील कलिंगड, कोकमचे नुकसान झालेले असून या नुकसानीची आकडेवारी अद्याप कृषी विभागाकडे प्राप्त झालेली नाही.

जिल्ह्यात ८ मे पासून पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. या पावसामुळे या परिसरातील आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सपुंष्टात आला. त्यानंतर १६ ते २७ मे या कालावधीत जिल्ह्याच्या सर्व भागांत जोरदार पाऊस झाला.

२१ मे ते २७ मे या कालावधीत ४२९ मिमी पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यात कलिंगड, कोकम, जांभूळ, भुईमूग, चवळी, आंबा आणि काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले. पूर्वपट्ट्यातील आठ ते दहा हजार हेक्टरवरील आंब्याला तडाखा बसला. तर जिल्ह्यात १५०० हेक्टरवरील कोकम पूर्णतः वाया गेले.

त्यामुळे नुकसानीची दाहकता अधिक होती. परंतु कृषी विभागाने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ २६.४४ हेक्टरवरील नुकसान झाल्याचे स्पष्ट केले आहे. ७४ गावांतील १७५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची आकडेवारी कृषी विभागाकडे आहे. प्रत्यक्षात हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेकडो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामेच केलेले नाहीत.

पावसामुळे कोकम पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु या नुकसानीचे अद्याप पंचनामे आमच्याकडे केलेले नाहीत. आम्ही वेळोवेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानीसंदर्भात संपर्क केला परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
- सुशांत नाईक, शेतकरी, वेतोरे, ता. वेंगुर्ला
जिल्ह्यात झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे काही प्रमाणात करण्यात आले आहेत. २ जूनपर्यंत २६ हेक्टरपर्यंत आकडेवारी प्राप्त आहे. यामध्ये वाढ होणार आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
- अरुण नातू, तांत्रिक अधिकारी, जिल्हा कृषी विभाग, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Roll Revision Protest: ‘एसआयआर’ प्रक्रिया थांबवा : डाॅ. अजित नवले

Tomato Farming Success Story: टोमॅटो शेतीतून प्रगती गाठलेले बोरीबेल

Drought Management: सरपंचांनो, गावाचा ताळेबंद मांडा..

Minimum Support Price: ‘कमी’भाव जाहीर

Drought Mitigation: दुष्काळ निवारणाला द्या नवा आयाम

SCROLL FOR NEXT