Rain Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain: सिंधुदुर्ग, दोडामार्गमध्ये मुसळधार पाऊस सुरूच; आंबा हंगाम धोक्यात

Mango Crop Damage: राज्यात अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्गात सातत्याने कोसळणाऱ्या सरींमुळे आंबा हंगाम धोक्यात आला असून काही जिल्ह्यांत शेतीचेही नुकसान झाले आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: राज्यातील अनेक जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १६) जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून एका गाईचा मृत्यू झाला. तर तीन-चार घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले. सिंधुर्दुग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याला गुरुवारी (ता. १५) पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी (ता. १६) पहाटेपासून अनेक भागांत पावसाच्या सरी सुरू होत्या. या पावसाचा अंतिम टप्प्यातील आंबा पिकांवर परिणाम झाला आहे. रत्नगिरी जिल्ह्यात गुरुवारी रात्रभर पाऊस पडला.

सिंधुदुर्गात ८ मेपासून पाऊस सुरू असून तीन-चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. ११ ते १४ मे या कालावधीत वैभववाडी, कणकवली तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी सायकांळी दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या भागात जोरदार सरी कोसळल्या.

याशिवाय वैभववाडी, कणकवली, कुडाळ या तालुक्यांतदेखील पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारी (ता. १६) पहाटेपासूनच ढगांच्या हलक्या गडगडाटासह तळेरे, खारेपाटण, वैभववाडी, कणकवली, कुडाळ या तालुक्यांत सरी बरसल्या. पावसामुळे पूर्व पट्ट्यातील आंबा हंगाम संपुष्टात आला. तर पश्चिम पट्ट्यातील अंतिम टप्प्यातील हंगामालादेखील पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आळंद परिसरात शुक्रवारी (ता. १६) दुपारी साडेबाराच्या सुमारास धुवाधार पाऊस. माणिकनगरात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस उर्वरित जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. बोरगाव कासारी (ता. सिल्लोड) शिवारातील गट नं २०२ मध्ये वीज पडून गोरख उत्तम ब्राह्मण यांच्या गाईचा मृत्यू झाला. तर केऱ्हाळा येथे तीन-चार घरांवरील पत्रे उडाले.

परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात गुरुवारी (ता. १५) दुपारी ४ ते ५ दरम्यान ढगफुटीसदृश पाऊस व चक्रीवादळाने परकंदी येथील डाळिंब बागांचे लाखोंचे नुकसान झाले. सोनाळा (जि. बुलडाणा) येथे दुपारच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस पडला. मालेगाव (जि. वाशीम) येथेही दुपारी जोरदार पाऊस झाला. शेतात काढण्यासाठी आलेला मका, ज्वारी आणि काही प्रमाणात केळीचे नुकसान झाले.

दानापूर (ता. तेल्हारा) येथे पुंडलिक घायल यांच्या शेतातील झोपडीवरील टीनपत्रे वाऱ्याने उडून गेले. शेतातील डीपीसुद्धा जोरदार वाऱ्याने कोलमडून पडली. सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री काही भागांत चांगला पाऊस झाला. मात्र शुक्रवारी सकाळपासून कडक ऊन होते. नागपूरमध्ये ढगाळ वातावरण आणि ऊन होते. तर धाराशिव, लातूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण, ऊन व अधूनमधून सरी पडल्या. तर नाशिकमध्ये शुक्रवारी ढगाळ वातावरण होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Price: देशात सोयाबीनच्या दरात सुधारणा

Banana Export: पिंप्री खुर्द गावातील केळीची परदेशात निर्यात

Agriculture Minister Bharane: शेतकऱ्यांना आनंदी करणारे कामकाज करू: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Farm Road: शेतरस्त्यांसाठी जमिनींचा ताबा

Papaya Market: खानदेशात पपई आवक वाढण्याचे संकेत

SCROLL FOR NEXT