Pune Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व जोरदार पाऊस

Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. ९) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पुणे शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. ९) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पुणे शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर या तालुक्यांत ढगाळ वातावरण होते. तर तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. सकाळी ऊन पडत असले तरी दुपारनंतर वातावरणात वेगाने बदल होत आहे. तर काही वेळा सायंकाळनंतर वेगाने वारे वाहत आहे.

अचानक ढग भरून येत असून पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत निमगिरी येथे १० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर माळीण येथे १ मिलिमीटर, लवासा, लव्हळे येथे एक मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा वाढत असला तरी कमाल व किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पुणे शहरातील गुलटेकडी, पद्मावती, हडपसर, स्वारगेट अशा विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा तयार झाला होता. पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: २०२६–२७ अर्थसंकल्पात तरुणांसाठी शिक्षण, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या घोषणा

Agricultural Machinery Subsidy: मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजनेसाठी अर्ज करा

SevaKarmi Plus: ‘सेवाकर्मी प्लस’ अभियानात ‘शबरी महामंडळ’ प्रथम

Rural Life: गोष्ट एका मायाळू जिवाची

Natural Farming Mission: नैसर्गिक शेती अभियानांतर्गत ५४ शेतकरी गट स्थापन

SCROLL FOR NEXT