ॲग्रो विशेष

Hail and Unseasonal Rain : नांदेड जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Aslam Abdul Shanedivan

Naded News : गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने विदर्भला अवकळी आणि गारपिठीचा इशारा दिला होता. यानंतर आता विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिठीने हाहाकार माजवला आहे. येथे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, अर्धापूर किनवट आणि उमरी तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने गहू, हरभरा आणि ज्वारी पिके आडवी झाली आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यातील उमरी, मुदखेड आणि हिमायतनगर तालुक्यात रविवारी दुपारनंतर मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाल्याने उमरी तालुक्यातील तळेगाव, उमरी, गोरठा, फुलसिंगनगर, इश्वरतांडा, सोमठाणा, दुर्गानगर या गावांमध्ये पिकांचे नुसकान झाले आहे.

तसेच मुदखेड तालुक्यातील डोणगाव, वरदडा, कोल्हा, मेंढका, वाई येथे देखील पावसाने मोठे नुकसान केले. तर हिमायतनगर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे पळसपूर, डोल्हारी, शिरंजनी, एकंबा, बोरगडी, मंगरुळ, सवना, टेंभी या गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

उमरी तालुक्यात रविवारी झालेल्या गारपीटमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. येथे अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीचे उभे पिक आडवे झाले. तर हरभरा आणि गव्हाची काढणी काढतानाच वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.

चौथ्यांदा गारपीटने झोडपले

गेल्या दहा महिन्यात चौथ्यांदा गारपीटने मुदखेड तालुक्यास झोडपले आहे. येथे रविवारी झालेल्या गारपीटने गहू, ज्वारी, हरभरा पिकाचे नुकसान झाले असून पिके भूईसपाट झाली आहेत. तर या पावसाचा फटका ऊसतोडणीलाही बसला आहे. तसेच तालुक्यातील पिंपळकोठा चोर येथे एका युवकाचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

पपई, फुलशेती नुकसान

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विविध भागात हजेरी लावत मोठे नुकसान केले आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे अर्धापूर, मुदखेड परिसरातील पपई बागांसह फुलशेतीचेही नुकसान झाले आहे.

आंबामोहर पिकाचे मोठे नुकसान

दरम्यान हिमायतनगर तालुक्यात सुमारे अर्धा तास गारांसह पाऊस झाल्याने रब्बी गहू, हरभरा, टाळकी, भाजीपाल्यासह तूरीचे मोठे नुकसान झाले आहे. येथे गारांसह पाऊस झाल्याने आंबामोहर पिकास फटका बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT