Tur Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Crop Damage : खरिपातील तुरीच्या पिकाचे उमरा मंडलात मोठे नुकसान

Kharip Season : खरीप हंगामात आंतरपीक म्हणून घेतल्या जाणाऱ्या तुरीच्या पिकाचे या भागात अतोनात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Akola News : खरीप हंगामात आंतरपीक म्हणून घेतल्या जाणाऱ्या तुरीच्या पिकाचे या भागात अतोनात नुकसान झाले आहे. पाऊस, धुके व आता किडीने या पिकाची वाट लावली. अकोट तालुक्यातील उमरा मंडळात २६ नोव्हेंबरपासून मॉन्सूनोतत्तर पाऊस झाला. त्यामुळे शेतांमध्ये उभे असलेले तुरीचे पीक जमिनीवर झोपले.

सोबतच वेचणीला आलेला कापूसही ओला झाल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. या पावसामुळे आधीच तुरीचा फुलोर गळून पडला. तुरीच्या झाडावर लागलेल्या शेंगाही तुटून पडल्या. तुरीच्या पिकासाठी हे मारक असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

लिंबू फळबागांना फटका

या पावसामुळे लिंबू पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक लिंबू बागात फळांचा सडा खाली पडला आहे. सर्वच लिंबू बागाचा सध्या मशागतीचा काळ होता. तर अनेक बागा ताणावर आणि लिंबू उत्पादन सुरु असलेल्या बागा फुलोरावस्थेत होत्या.

अचानक २६ नोव्हेंबर रोजी आलेल्या पावसामुळे बागा फुटण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे लिंबू उत्पादनात भविष्यात घट दिसून येणार आहे.

मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तुरीच्या झाडांवरील फुले झडली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला गेला. शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आवश्यकता आहे.
वासुदेव केदार, मनोज भगत, शेतकरी, उमरा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT