Onion Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Heatwave Crop Damage : कांदा उत्पादनाला अतिउष्णतेचा फटका

Onion Crop Loss : यंदा सातत्याने अतिउष्णतामान राहिल्याचा फटका या पिकाला बसला आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघेनासा झाला.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात लेट रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा सातत्याने अतिउष्णतामान राहिल्याचा फटका या पिकाला बसला आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघेनासा झाला.

त्यातच आता अवकाळी पाऊसही नुकसानकारक ठरला. त्यामुळे शासनाने या आपत्तींसाठी शेतकऱ्यांना अर्थ साह्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली आहे.

याबाबत तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की यावर्षी नैसर्गिक आपत्तीसमवेतच जिल्ह्यात तापमान ४२ ते ४५ अंशांपर्यंत वाढल्याने कांदा पिकावर विपरित परिणाम झाला.

कांदा परिपक्व न झाल्यामुळे उत्पादनात घट येऊन शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. अशा परिस्थितीत कांद्याला बाजारपेठेत भावही नाहीत. या संकटांनी शेतकरी आधीच हवालदिल असताना गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडल्‍याने कांद्याचे नुकसान झाले. शासनाने नैसर्गिक आपत्ती निकषानुसार कांदा पिकाचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यास योग्य ती भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना पाठबळ दिले जावे.

सद्यःस्थितीत कांदा पिकाचे उपटणी व काढणीचेही पैसे निघत नाहीत. आज बाजारभाव ५०० ते ७०० रुपयांपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष नीलेश नेमाडे, प्रशांत रत्नपारखी, शुभम एकघरे, सुनील कळसकर, अशोक घाटे, हाजी बरकत खान आदींनी हे निवेदन दिले.

यावर्षी लेट रब्बीतील कांद्याचे उत्पादन एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होत नाही. परिणामी शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्‍यकता आहे.
- नीलेश नेमाडे, कांदा उत्पादक, अडगाव, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT