Heat Wave  Agrowon
ॲग्रो विशेष

Heat Wave : चंद्रपुरात उष्ण लाटेचा इशारा

Weather News : चुरू येथे उच्चांकी ५०.५ अंश तापमान; विदर्भातही चटका कायम

Team Agrowon

Weather UPdate : पुणे : देशाच्या वायव्य आणि मध्य भागात तीव्र उन्हाळा अनुभवायला मिळत आहे. राजस्थानच्या चुरू येथे आतापर्यंतच्या उच्चांकी ५०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातही उन्हाचा चटका कायम आहे. आज (ता. ३०) मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर चंद्रपूर येथे उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

राजस्थानसह पाकिस्तानमध्ये सूर्याचा प्रकोप कायम असल्याने तापमान पन्नाशी पार आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राजस्थानच्या चुरू येथे आतापर्यंतच्या उच्चांकी ५०.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. या पूर्वी २६ मे १९९८ मध्ये तेथे ४९.९ अंश तापमानाची नोंद झाली होती. महाराष्ट्रातही विदर्भात उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरत असून, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे प्रत्येकी ४५.२ अंश तापमान नोंदले गेल्याने उष्ण लाट होती.

आज (ता. ३०) विदर्भातील चंद्रपूर येथे उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा आहे. तर मुंबईसह पालघर आणि ठाणे येथे उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका कमी-अधिक होत उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘रेमल’ तीव्र चक्रीवादळ निवळले आहे.

बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३५.६, धुळे ४३, कोल्हापूर ३३.७, महाबळेश्‍वर २६.८, मालेगाव ४२.८, नाशिक ३५.९, निफाड ३७.२, सांगली ३३.९, सातारा ३४.७, सोलापूर ३७.८, सांताक्रूझ ३४.६, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३३.४, छत्रपती संभाजीनगर ४२, बीड ४१.५, नांदेड ४२.६, परभणी ४३.२, अकोला ४२.८, अमरावती ४४.६, भंडारा ४४, बुलडाणा ४०, ब्रह्मपुरी ४५.२, चंद्रपूर ४५.२, गडचिरोली ४४.६, गोंदिया ४४.२, नागपूर ४४.८, वर्धा ४५.२, वाशीम ४२.८, यवतमाळ ४३.

४४ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
ब्रह्मपुरी ४५.२, चंद्रपूर ४५.२, वर्धा ४५.२, नागपूर ४४.८, अमरावती ४४.६, गडचिरोली ४४.६, गोंदिया ४४.२, भंडारा ४४.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Farmer Income: शेतकऱ्यांचं चांगभलं!

Ginger Price: आले बियाण्याच्या गाडीला २५ ते २६ हजार रुपये दर

Summer Weather Alert: उन्हाच्या चटक्यात सातत्यपूर्ण वाढ वादळी पावसाचा अंदाज कायम

Uddhav Thackeray: आम्ही कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली- उद्धव ठाकरे

Farm Labour Shortage: शेतमजुरांची टंचाई; सालगडी मजुरी अडीच लाखांवर

SCROLL FOR NEXT