Heatstroke Room Agrowon
ॲग्रो विशेष

Heatstroke Room : कोल्हापुरातील ७६ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष

Heatstroke Update : खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

Team Agrowon

Jaysinghpur News : वाढता उष्मा आणि त्यातच संभाव्य उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र सुरू केले आहेत.

एप्रिल व मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन केले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना व ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करून सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्याबाबत सूचित केले. त्यासाठी हवेशीर खोली, पुरेसा औषधसाठा, कक्षात पंखे, कूलरची सुविधा उपलब्ध केली आहे. उष्माघाताने होणारे मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये पुरेपूर उपाययोजना करण्यात येणार आहेत.

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या तापमानाचा लोकांना धोका जाणवू शकतो. विशेषतः शेतात काम करणाऱ्‍या शेतकऱ्‍यांना उष्माघाताचा धोका जाणवतो. शेतकऱ्‍यांनी उन्हात काम करताना सावधगिरी बाळगावी, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. उन्हाळ्यात अनेक जण दुपारी बाराच्या आतच कामे आपटून घेतात.

मात्र, मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात तापमानात कमालीची वाढ होऊ लागली आहे. सध्या शहाराचे तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शेतकऱ्‍यांना शेतीमध्ये काम करणे गरजेचे असते. त्यामुळे अनेकदा ग्रामीण भागात उष्माघात झाल्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.

उष्माघात होऊ नये यासाठी दुपारनंतर उन्हात जाणे टाळावे. सकाळी व सायंकाळी कमी उन्हात कामे आटोपावीत. सातत्याने पाणी पीत राहावे, गॉगल, छत्री, टोपी घालावी किंवा पांढऱ्‍या सुती रुमालाने डोके झाकावे, काळे व भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. तसेच सैल व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, आरोग्यास अपायकारक असलेली शीतपेये शक्यतो टाळावीत. त्यापेक्षा लिंबूपाणी, ताक, मठ्ठा, चिंचेचे पन्हे, कैरी पन्हे इत्यादींचा वापर करावा.
डॉ. पांडुरंग खटावकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT