Heat Wave Agrowon
ॲग्रो विशेष

Heatstroke Control Room : झेडपीच्या आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण कक्ष

एप्रिलच्या सुरवातीपासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. हा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Solapur News : एप्रिलच्या सुरवातीपासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. हा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर उष्माघाताने जिल्ह्यातील कोणीही उष्माघाताने बाधित होवू नये म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्र सुरू करण्याच्या सूचना आज आरोग्य विभागास दिल्या आहेत.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याच्या नियोजनाची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, प्रशासन अधिकारी डॉ. मोहन शेगर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

सीईओ स्वामी म्हणाले, उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्रात उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे, उष्माघाताबद्दल आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे उष्माघाताने त्रस्त रूग्णांना आवश्यक त्या उपचाराची सोय केली जाणार आहे.

कोरोना लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य

शासनामार्फत कोविड १९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाचा. इन्कोव्हॅक लसीची खरेदी करून जिल्हा व महापालिका यांना वितरित करण्यात येणार आहे. सध्या राज्यात कोविड- १९ आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या व झालेल्या मृत्यूचे विश्लेषण केले असता कोविड-१९ मृत्यूचे प्रमाण हे ६० वर्षावरील नागरिकांमध्ये जास्त असल्याचे दिसून येते.

त्यामुळे इन्कोव्हॅक लसीचा पुरवठा झाल्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांच्या प्रिकॉशन डोससाठीच लस फक्त वापरावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT