Maize Production Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Production : खानदेशात मका पिकात उत्पादन कमी

Maize Farming : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा वाढली. पण पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप व अतिउष्णता यामुळे उत्पादन कमी येत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा वाढली. पण पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप व अतिउष्णता यामुळे उत्पादन कमी येत आहे. एकरी १८ ते २० क्विंटल उत्पादन कमाल शेतकऱ्यांना हाती येत आहे. किमान एकरी २२ ते २५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

यंदा पिकात कीडनाशकांच्या फवारण्या घ्याव्या लागल्या. त्यात उत्पादन खर्चही वाढला. यंदा ज्वारीपेक्षा अधिक मक्याची लागवड खानदेशात झाली. ही लागवड सुमारे दीड लाख हेक्टरवर झाली. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे ९८ हजार हेक्टरवर मका पीक होते. धुळ्यातील शिंदखेडा,

शिरपूर, साक्री आणि नंदुरबारमधील नवापूर, तळोदा, शहादा भागातही बऱ्यापैकी लागवड झाली होती. मक्याला मागील दोन हंगाम बऱ्यापैकी दर मिळाले. मागील खरीप व रब्बी हंगामातही मका लागवड बऱ्यापैकी होती. कारण दर चांगले राहीले. या हंगामातही दर व विपणन व्यवस्था लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु पिकात उत्पादन कमी आले. पीक पाच महिन्यांचे आहे.

अनेकांनी बागायती कापूस व अन्य बागायती पिके घेतल्यानंतर मका लागवड केली. जमिनीची पूर्वंमशागत होवून ती तापली नाही. अतिपाण्याने पिकाचे अपेक्षित उत्पादन आले नाही, असाही अंदाज शेतकरी बांधत आहेत. त्यात लष्करी अळीचा प्रकोप वाढला होता. हा प्रकोप दोन फवारण्या घेवूनही काही भागात थांबलेला नव्हता.

यातच २० ते २५ टक्के नुकसान झाले. खर्च वाढला. एका फवारणीसाठी एकरी किमान १२०० ते १३०० रुपये खर्च आला. अनेकांनी फवारणी वेळेत न घेतल्याने नुकसानीची पातळीही वाढत होती. यात उत्पादन खर्च वाढला, पण अपेक्षित उत्पादन हाती आले नाही.

पाऊस, ढगाळ वातावरणाचा फटका

जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, यावल, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, धरणगाव, एरंडोल भागात मका पीक अधिक होते. या भागात सर्वत्र अळीचा प्रकोप दिसत असतानाच डिसेंबरमध्ये पाऊस व गारपीट झाली. त्यानंतर दर महिन्यात ढगाळ, पावसाळी वातावरण काही दिवस होते. प्रतिकूल वातावरणाचाही पिकावर परिणाम झाला, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरणाने थंडी कमी व्हायची. यामुळेदेखील अळीचा प्रकोप होण्यास अनुकूल स्थिती तयार होत होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT