APMC Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Apmc Election : सांगली बाजार समितीच्या माजी संचालकांच्या अपात्रतेवर उद्या सुनावणी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणातील नऊ माजी संचालकांच्या अपात्रतेबाबत केलेल्या अपिलावर पणन संचालकांसमोर गुरुवारी (ता. १३) सुनावणी होणार आहे.

Team Agrowon

Sangli Apmc Election Update : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणातील नऊ माजी संचालकांच्या अपात्रतेबाबत केलेल्या अपिलावर पणन संचालकांसमोर गुरुवारी (ता. १३) सुनावणी होणार आहे.

याबाबतचे आदेश सोमवारी (ता. १०) सायंकाळी काढण्यात आले. त्यामुळे पणन संचालकांच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापासून शह-काटशहचे राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी गटातील माजी संचालकांच्या अर्जावर संचालकांच्या उमेदवारीवर अनिल शेगुणसे यांनी आक्षेप घेतला होता.

या माजी संचालकांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका चौकशी अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे. संतोष पाटील, प्रशांत शेजाळ, वसंत गायकवाड, दीपक शिंदे, अण्णासाहेब कोरे, अभिजित चव्हाण, मुजीर जांभळीकर, बाळासाहेब बंडगर आणि अजित बनसोडे या संचालकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात यावेत, अशी मागणी अनिल शेगुणसे यांनी केली होती.

उमेदवारी अर्जांवरील हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी घेतलेल्या सुनावणीत बाजार समितीतील संचालकांच्या कारभारावर चौकशी अहवालातील आक्षेपामुळे नऊ माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरविले.

या निर्णयाविरोधात माजी संचालकांनी पणन संचालकांकडे ६ रोजी अपील करून जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. पणन संचालकांकडून गुरुवारी (ता. १३) अपात्रेवर सुनावणी घेतली जाणार आहे.

त्याबाबतचे लेखी आदेश सोमवारी (ता. १०) काढण्यात आले. तक्रारदार शेगुणसे आणि नऊ माजी संचालकांची सुनावणी होऊन पणन संचालकांकडून निर्णय दिला जाणार आहे. त्यामुळे अपात्रतेचा निर्णय कायम राहणार की उमेदवारी अर्ज वैध ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय

Modern Farming Techniques: शेतकऱ्यांनी जाणले संत्रा-कापूस पिकाचे तंत्रज्ञान

Agriculture Department Inspection: खत-बियाणे विक्रेत्यांना दणका

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

SCROLL FOR NEXT