Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ‘एफआरपी’ थकविलेल्या सोलापूरातील १३ कारखान्यांची मंगळवारी सुनावणी

Sugar Factory : सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांची थकीत एफआरपी प्रकरणी मंगळवारी (१८ मार्च) साखर आयुक्तालयात सुनावणी होणार आहे.

Team Agrowon

solapur News : सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांची थकीत एफआरपी प्रकरणी मंगळवारी (१८ मार्च) साखर आयुक्तालयात सुनावणी होणार आहे. फेब्रुवारीअखेर जिल्ह्यातील २६ कारखान्यांकडे राज्यातील सर्वाधिक ५६८ कोटी रुपये एफआरपी थकली आहे. त्यातील ६० टक्केपेक्षा कमी एफआरपी दिलेल्या १३ कारखान्यांकडे ३११ कोटी रुपये थकले आहेत.

जिल्ह्यातील ३३ पैकी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रत्येकी एक, २२ कारखान्यांचा फेब्रुवारीत, सात कारखान्यांचा जानेवारीत तर दोन कारखान्यांचा मार्चमध्ये गाळप हंगाम आटोपला. त्यानंतर १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात उसबिले जमा होणे अपेक्षित होते.

मात्र, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे न देता थकविले आहेत. तत्कालीन साखर आयुक्त कुणाल खेमणार यांनी १३ फेब्रुवारीला सुनावणी घेतली होती. सुनावणीवेळी एकीकडे साखर कारखाने ऊस उत्पादकांचे पैसे देतो, असे लेखी स्वरूपात देतात.

तर दुसरीकडे कारखाने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाहीत. साखर कारखान्यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकरी जाम वैतागले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती पक्षाने थकीत ऊसबिलांसाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला.

त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस पुरावठादारांची उसबिले थकविल्याने ऊसदर नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदींनुसार साखर आयुक्तालयाकडून साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिलेल्या कारखान्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

एफआरपी पेमेंट थकविल्यामुळे कारखान्यांविरुद्ध आरआरसी निर्गमित करण्याची कारवाई का करण्यात येऊ नये?, असे नोटिसांमध्ये म्हटले आहे. सुनावणीच्या अनुषंगाने उसबिले थकीत करणाऱ्या साखर कारखान्यांवर पुढील नियमोचित कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुनावणी होणारे १३ कारखाने

कारखाना थकीत एफआरपी (कोटीत) दिलेल्या एफआरपी (टक्के)

लोकमंगल (भंडारकवठे) ५०.०९ ४४.०१

जयहिंद शुगर ४८.२८ ३६.१०

सिद्धनाथ शुगर ३९.०६ ३५.५७

संत दामाजी ३५.८० ५२.८६

जकराया २८.४८ ४६.०१

गोकूळ शुगर (धोत्री) २८.३० ०

इंद्रेश्वर २२.३५ ४५.०४

लोकमंगल (बीबीदारफळ) १७.६१ ४७.२३

भैरवनाथ (आलेगाव) १६.७१ ५०.१२

भैरवनाथ (लवंगी) १४.३७ ४६.५८

येडेश्वरी ८.५४ ५५.५६

मातोश्री शुगर ५.८७ ०

धाराशिव (सांगोला) ५.७२ १३.४२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT