Water Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Water Pollution : ममदापूरमध्ये दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Water Pollution Supply : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील ममदापूर (ता. येवला) येथे नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत आहे.

Team Agrowon

Nashik Water Problem : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील ममदापूर (ता. येवला) येथे नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी ग्रामस्थांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन शुद्ध तसेच पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

मागील काही दिवसांपासून पाणी टंचाईच्या झळा जाणवत असून ममदापूर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. हे पाणी येथील पाणी पुरवठ्याच्या विहिरीत सोडण्यात येते. मात्र विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणी हिरवट, पिवळसर रंगाचे होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावाला टँकरद्वारे येणारे पाणी स्वच्छ येत आहे. परंतु त्या पाण्याची योग्य साठवणूक व व्यवस्थापन होत नसल्याने नळाद्वारे येणारे पाणी दूषित व गढूळ येत असल्याची नागरिकांमधून प्रचंड ओरड सुरू आहे.

त्याचबरोबर गावात लाखो रुपये खर्च करून पाण्याचे फिल्टर बसवले आहेत. मात्र त्याद्वारे येणाऱ्या पाण्यालाही दुर्गंधी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ सुरू असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

पूर्वनियोजन शून्य

गावात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरने गावात पाणी आणून पाणीपुरवठा करणाऱ्या गावातील बंधाऱ्यात असलेल्या विहिरीत पाणी टाकले जाते. मात्र दरवर्षी पावसाळ्यातील गाळ हा विहिरीत जमा होत असतो. त्यामुळे खाली गळाचा थर असल्याने पाणी टाकल्यानंतर गढूळ होते. याची कल्पना असतानाही पूर्वनियोजन किंवा काळजी का घेतली जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

पाणी साठवणूक करत असलेल्या विहिरीचे काम सुरू आहे. त्यामुळे गाळ होत असे. आता जुन्या आडामध्ये पाणी टाकले जात आहे. त्यामुळे गढूळ व दूषित पणी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल.
ईश्वर गायकवाड, ग्रामसेवक, ममदापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT