Rabi Crop Harvesting Latur News : विभागातील रब्बी हंगामातील (Rabi Season) सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर आहे. प्रत्यक्षात १६ लाख ७९ हजार ३६१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या १२३ टक्के प्रत्यक्ष पेरणी (Rabi Sowing) झालेली आहे. या सर्व पिकांच्या काढणीचा हंगाम (Rabi Crop Harvesting) सध्या जोरात सुरू आहे.
विभागातील पीकनिहाय लागवड व काढणी ः
रब्बी ज्वारी : या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३७१८५७ हेक्टर आहे. प्रत्यक्षात २९७९०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ८० टक्के आहे. पीक सध्या दाणे भरण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत आहे. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. रब्बी ज्वारी पिकाची सध्या काढणी सुरू असून, १० ते १५ टक्के काढणी पूर्ण झाली आहे.
गहू : या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १५६५१९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात १५४२१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सध्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकाची २५ ते ३० टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.
हरभरा ः या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७८६१२४ हेक्टर आहे. प्रत्यक्ष ११५९८३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी १४८ टक्के आहे. पीक सध्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकाची सध्या काढणी सुरू आहे. ५० ते ५५ टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.
रब्बी मका ः या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७९७१ हेक्टर आहे. प्रत्यक्षात १७७६४ हे. क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सध्या कणसे भरण्याच्या अवस्थेत आहे.
करडईची ५० टक्के काढणी पूर्ण
करडई पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९५३१ हेक्टर आहे. प्रत्यक्ष २३९४८ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी १२३ टक्के आहे. पीक सध्या पक्वतेच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी पिकाची काढणी सुरू आहे. ४५ ते ५० टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.