Hapus Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango Rate : हंगामाच्या अंतिम टप्प्यात हापूसचे दर स्थिर

Hapus Mango Market : प्रतिडझन ५०० ते ६०० रुपयांनी स्थानिक बाजारपेठेत विक्री

Team Agrowon

Mango Production : आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी अद्याप हपूसचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. सध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये हापूसची प्रतिडझन पाचशे ते सहाशे रुपयांनी विक्री केली जात आहे. आंब्याची आवकदेखील वाढली आहे.

जिल्ह्यात यावर्षी १६ नोव्हेंबरला देवगड हापूसची पहिली पेटी बाजारपेठेत दाखल झाली. त्यानंतर आठवडा-दोन आठवड्यानंतर अनेक बागायतदारांच्या बागांमधून किरकोळ प्रमाणात आंबा बाजारपेठेत आला. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आंब्याची आवक थोडीशी वाढली. परंतु खऱ्या अर्थाने मार्चमध्ये आंब्याची आवक वाढली.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून नियमित आंबा हंगाम सुरू झाला. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात आंबा राज्यासह देशभरातील विविध बाजारपेठांमध्ये पोहोचला. यावर्षी नियमित हंगाम सुरू झाला त्या वेळी देवगड हापूसचा दर प्रतिडझन ७०० ते ८०० रुपयांपर्यंत होता.

त्यामध्ये किंचित घट होऊन तो ६०० रुपयांपर्यंत आला. मात्र त्यानंतर आंब्याची आवक खूपच वाढली. त्यामुळे आंब्याचे दर कमी होतील, असे वाटत होते. मात्र देवगड हापूसचे दर स्थिरच राहिले. आता या वर्षीचा आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अनेकदा अंतिम टप्प्यात आंब्याचे दर काही प्रमाणात कमी होतात, परंतु यावर्षी दर स्थिर राहीले आहेत.

सध्या देवगड हापूसच्या पेटीचा दर स्थानिक बाजारपेठेत २२०० ते २४०० रुपयांपर्यंत आहेत. हाच दर विविध शहरांमध्ये २५०० ते ३००० हजार रुपयांपर्यंत स्थिर राहिला आहे. आंबा हंगाम संपेपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

एकीकडे देवगड हापूसचे दर स्थिर असताना जिल्ह्यातील आंब्याचे दर मात्र कमी झाले आहेत. पूर्वपट्ट्यातील आंबा बाजारपेठेत आल्यामुळे सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी तालुक्यांत आंब्याचे दर प्रतिडझन ३०० रुपयांपर्यंत आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT