Solapur APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC : मागण्यांसाठी हमाल-तोलारांचे सोलापुरात कामबंद आंदोलन

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व हमाल-तोलार कामगारांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे.

Team Agrowon

Hamal-Tolars protest : सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व हमाल-तोलार कामगारांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे. या मागण्यांबाबत प्रशासनाशी चर्चाही झाली, पण त्यावर ठोस निर्णय न झाल्याने मंगळवारी (ता. १०) निदर्शने करत कामगारांनी संप पुकारला. कामगारांच्या या आंदोलनामुळे बाजार समितीतील कांदा, फळे आणि भाजीपाल्याचे व्यवहार होऊ शकले नाहीत.

परिणामी, सुमारे चार कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली. हमाल पंचायतचे संचालक शिवानंद पुजारी, अमोल शिंदे, उपाध्यक्ष भीमराव सीताफळे, सिद्धू हिप्परगी, नागनाथ खंडागळे, चांदा गफार, किरण मस्के, महेंद्र चंदनशिवे, राजशेखर काळगी, शिवलिंग शिवपुरे, यास्मीन बागवान, हालू जमादार, सुनीता रोटे आदी या आंदोलनात सहभागी झाले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजाराकरिता लागू करण्यात आलेला टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द झाला पाहिजे, संपूर्ण माथाडी कामगाराच्या हमाली तोलाईचा भरणा माथाडी बोर्डात झाला पाहिजे, माथाडी कामगारांकरिता, घरकुल व प्राथमिक उपचार केंद्र झालेच पाहिजे, कांदा विभागामधील माल राखणे बंधनकारक करू नये, तसेच भुसार व कांदा विभागामध्ये ५० किलोच्या भरतीचे नियमन असताना शेतकरी ६०, ७०, ८० किलो भरतीचे पोते बाजारात आणत आहेत, ते त्वरित बंद झाले पाहिजे, अशा विविध मागण्या या आंदोलनामध्ये हमालतोलार कामगारांनी मांडल्या.

कांदा, फळे-भाजीपाल्याचे व्यवहार ठप्प हमाल-तोलारांनी काल पुकारलेल्या संपामुळे कांदा आणि भाजीपाल्याच्या व्यवहारावर परिणाम झाला. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. विशेषतः फळे- भाजीपाला बाजाराला त्याचा अधिक फटका बसला. सुमारे चार कोटीहून अधिक उलाढाल त्यामुळे ठप्प झाली. मागण्यांबाबत सकारात्मक विचार न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT