Hailstorm Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm : तासगावात गारपीट, वाऱ्याचा द्राक्ष बागेला फटका

Vineyard Damage : सांगली जिल्ह्यात फळछाटणी सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून फळ छाटणीला गती आली आहे. तासगाव तालुक्यातील कौलगे, सावर्डे, चिंचणी, मणेराजुरी, खुजगाव, वाघापूर, योगेवाडी या परिसरात द्राक्षबागांची फळछाटणी जोमात सुरू होती.

Team Agrowon

Sangli News : तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, योगेवाडी, सावर्डे, यासह अन्य भागात बुधवारी (ता. २) सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे सुमारे ४६० एकरावरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले असल्यचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.

द्राक्ष बागांच्या काड्या व फुटलेले कोंब मोडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बाधित झालेल्या बागांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यात फळछाटणी सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून फळ छाटणीला गती आली आहे. तासगाव तालुक्यातील कौलगे, सावर्डे, चिंचणी, मणेराजुरी, खुजगाव, वाघापूर, योगेवाडी या परिसरात द्राक्षबागांची फळछाटणी जोमात सुरू होती. सुमारे तीस टक्के बागांच्या फळछाटण्या झाल्या आहेत.

मात्र, बुधवारी (ता. २) सायंकाळी वादळी वारे, जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. गारपिटीचा जोरदार तडाखा या बागांना बसला आहे. गारा पडल्याने मणेराजुरी भागातील द्राक्ष बागांच्या काड्या व फुटलेले कोंब मोडले. गारांच्या माऱ्याने पानांची चाळण झाली. तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने उभी पिके जमीनदोस्त झाली.

कौलगे, सावर्डे, चिंचणी, मणेराजुरी, खुजगाव, वाघापूर, यांसह तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने झोडपले. या गारांमुळे फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले. डोळे फुगलेल्या व फुटत असलेल्या द्राक्ष बागांच्या काड्यांचे डोळे गारांच्या माराने मोडून पडले तर काही द्राक्ष बागांची पाने फाटली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काढणीचा खरीप पाण्यात कुजत असून वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, द्राक्ष बागायतदार संघाने तासगाव तालुक्यातील विविध भागांत द्राक्षाचे नुकसान झालेल्या बागांची पाहणी केली. या वेळी या परिसरातील सुमारे ४६० एकरावरील द्राक्ष बागेला वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने बाधित झालेल्या बागांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT