Hailstorm Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Alert : नगर, नाशिकमध्ये गारपिटीचा इशारा

Weather Update : कोकणात उष्ण लाट; राज्यात वादळी पावसाचे सावट कायम

Team Agrowon

Maharashtra Weather News : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची हजेरी कायम असल्याने राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. आज (ता. १६) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा आहे. कोकणात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४१ अंशांच्या वर सरकला आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहे.

दक्षिण श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर दक्षिण कर्नाटकपासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे आगमनास पोषक हवामान होत असल्याने रविवारपर्यंत (ता. १९) अंदमान बेट समूहावर मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

राज्यातही पूर्वमोसमी पावसाला (Rain) पोषक हवामान आहे. आज (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर नाशिक आणि नगर जिल्ह्यात गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने आला आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३७.१, धुळे ४०, जळगाव ४१.८ कोल्हापूर ३६.७, महाबळेश्‍वर ३०.१, मालेगाव ४०.१, नाशिक ३७.८, निफाड ३७.६, सांगली ३७.१, सातारा ३८.२, सोलापूर ३९.५, सांताक्रूझ ३६.८, डहाणू ३६, रत्नागिरी ३६.२, छत्रपती संभाजीनगर ३८.३, बीड ४०.९, नांदेड ३८.६, धाराशिव ३८.६, परभणी ३९.१, अकोला ४१.८, अमरावती ४०.६, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४१.४, गडचिरोली ३९.६, गोंदिया ३९.२, नागपूर ३८.९, वर्धा ४०, वाशीम ४१.२, यवतमाळ ४१.७.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :
नगर, नाशिक.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT