Farmer Producer Company Guidance Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Producer Company Guidance : ‘कार्बन क्रेडिट’विषयी शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन

Carbon Credit Trading : ‘कार्बन क्रेडिट ट्रेडिंग’ या विषयावर येथे जिल्ह्यातील सातपुडा नॅचरल शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

 गोपाल हागे

Akola News : ‘कार्बन क्रेडिट ट्रेडिंग’ या विषयावर येथे जिल्ह्यातील सातपुडा नॅचरल शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. भारत सरकारची ‘कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीम २०२३’ ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यस्तरीय शेतकरी उत्पादक कंपनी संचालक व प्रतिनिधींसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून ६० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभाग घेतला. यात पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ व मराठवाड्यातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी विलास वाशीमकर यांनी केले. कार्बन क्रेडिट योजनेतून शेतकऱ्यांना निसर्ग संवर्धनासोबतच आर्थिक उन्नती कशी साधता येईल व पर्यावरण वाचवत असतानाच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी होईल, या बाबत मार्गदर्शन केले.

राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनमध्ये या योजनेतून सुद्धा शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देणे हा घटक समाविष्ट केला असून, त्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर तसे शासन स्तरावरून कार्यशाळा व मार्गदर्शन आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

सातपुडा नॅचरल शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रूपेश पाटील लडे यांनी कार्बन क्रेडिट ट्रेडिंग बिझनेस या व्यवसायाची सविस्तर मांडणी करीत ही योजना तयार होण्याची कारणे, पॅरिस ॲग्रीमेंट व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्बन क्रेडिटची वाढती मागणी लक्षात घेता मुक्त अर्थव्यवस्थेचा फायदा घेऊन शेतकरी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून संघटित होऊन कार्बन क्रेडिटचा व्यवसाय करू शकतात.

आज ते गरजेचे असून त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोईसुविधा कार्बन क्रेडिट ट्रेडिंग व्यवसायासाठी लागणारे तंत्रज्ञान, वित्तीय व्यवस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता करणे, वेळोवेळी कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करणे या बाबत माहिती दिली. तसेच योजनेचे स्वरूप सांगितले.

चर्चासत्राला शाश्‍वत पालघर शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालिका श्रीमती मंदाकिनी नेरकर यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या महासंघाच्या माध्यमातून राज्यभरात कार्बन क्रेडिट बिझनेसचे जाळे पसरविण्याबाबत आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT