Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : परभणी, हिंगोली जिल्ह्यात हमीभावाने ९२३ क्विंटल सोयाबीन खरेदी

Soybean Rate : १८ खरेदी केंद्रांवर साडेआठ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

Team Agrowon

Parbhani News : परभणी ः किमान आधारभूत किंमत दराने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) परभणी, हिंगोली जिल्ह्यतील ४ केंद्रांवर गुरुवारपर्यंत (ता. २४) ६१ शेतकऱ्यांचे ९२३.४८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. दरम्यान, या जिल्ह्यांतील १८ खरेदी केंद्रांवर ८ हजार ५४६ शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली. केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत यंदा परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रिय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) यांच्यातर्फे मंगळवारपासून (ता. १५) सोयाबीन खरेदी केली जात आहे.

जिल्ह्यात परभणी, पेडगाव, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ९ ठिकाणी खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी गुरुवारअखेर (ता. २४) ५ हजार ५९३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी परभणी, मानवत, पाथरी, पूर्णा, बोरी येथील खरेदी केंद्रांवर सोयाबीन घेऊन येण्यासाठी नोंदणीकृत ३७४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. परभणी आणि पूर्णा या दोन खरेदी केंद्रांवर ४५ शेतकऱ्यांचे ७०६.९८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रिय नोडल एजन्सी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांच्यातर्फे हमीभावाने सोयाबीन, मूग, उडीद खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा या ९ खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे. या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी गुरुवारपर्यंत (ता. २४) २ हजार ९५३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, साखरा या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यासाठी ५५६ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. कळमनुरी आणि वारंगा या २ केंद्रांवर १६ शेतकऱ्यांचे २१६.५० क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT