Group Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Group Farming : शेतकऱ्यांसाठी गटशेती उत्तम पर्याय

Latest Agriculture News : निविष्ठा खरेदी, कृषी उत्पादनांची योग्य भावात विक्री असेल तर गटशेती हा उत्तम पर्याय आहे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : शेतीमधील निविष्ठांचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांनी गट स्थापन करून या गटाद्वारे कृषी निविष्ठा मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास त्यांना कृषी निविष्ठा या सवलतीच्या दरात मिळतील. निविष्ठा खरेदी, कृषी उत्पादनांची योग्य भावात विक्री असेल तर गटशेती हा उत्तम पर्याय आहे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात विसावी विस्तार शिक्षण परिषद बैठक झाली. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, विस्तार शिक्षण परिषदेचे तज्ज्ञ शेतकरी भाऊसाहेब जाधव, समाधान पाटील, सर्जेराव पाटील, बाळासाहेब आढाव उपस्थित होते.

डॉ. पी. जी. पाटील म्हणाले, की बदलत्या हवामानामुळे व रासायनिक खते आणि पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमी होऊन त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड द्यावी व जनावरांपासून मिळणाऱ्या सेंद्रिय खतांचा वापर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी करावा. शेतकऱ्यांनी सदैव प्रयोगशील राहावे व आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करावे.

कृषी विद्यापीठाचे संशोधन हे उच्च दर्जाचे असून विद्यापीठाचे विविध पिकांचे वाण हे भरघोस उत्पादन देणारे आहे. विद्यापीठ विकसित वाण, निविष्ठा, विद्यापीठाचे प्रकाशने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत अ‍ॅव्हाकॅडो, खजूर यासारख्या नवीन पिकांवर संशोधन होण्याची गरज असल्याचे भाऊसाहेब जाधव म्हणाले. बाळासाहेब आढाव यांनी विद्यापीठात सुरू असलेल्या नवनवीन उपक्रमांबाबत तसेच संशोधनाबाबत समाधान व्यक्त केले.

डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. विठ्ठल शिर्के यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ तर डॉ. गोकुळ वामन यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’

SCROLL FOR NEXT