Greenhouse Project Inaguration Agrowon
ॲग्रो विशेष

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

Agriculture Variety : ‘‘उच्च तंत्रज्ञानावर आधारित संशोधन हरितगृहामुळे सोयाबीनचा तांबेरा प्रतिकारक्षम, भुईमुगाचा टिक्का प्रतिकारक्षम वाण, तसेच हवामान बदलास अनुकूल सोयाबीन, भुईमुगाचे वाण कमी कालावधीत विकसित करण्यात मदत होणार आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘उच्च तंत्रज्ञानावर आधारित संशोधन हरितगृहामुळे सोयाबीनचा तांबेरा प्रतिकारक्षम, भुईमुगाचा टिक्का प्रतिकारक्षम वाण, तसेच हवामान बदलास अनुकूल सोयाबीन, भुईमुगाचे वाण कमी कालावधीत विकसित करण्यात मदत होणार आहे.

याचबरोबरीने विविध संशोधनासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित हरितगृहाचा वापर दिशादर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असणाऱ्या कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये नुकतेच उच्च तंत्रज्ञानावर आधारित संशोधन हरितगृह तसेच विविध संशोधन प्रकल्पातील उपकरणांचे उद्‌घाटन डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, माजी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मिलिंद देशमुख तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राचे बळकटीकरण तसेच शाश्वत उत्पन्न, मूल्यवर्धनासाठी सोयाबीन संशोधनाचे बळकटीकरण, क्षारपड जमीन सुधारणा संशोधनाचे बळकटीकरण आणि शाश्वत उत्पादनासाठी भुईमूग संशोधनाचे बळकटीकरण या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. या केंद्रावर दोन उच्च तंत्रज्ञानावर आधारित हरितगृहांची उभारणी, सोयाबीन मूल्यवर्धनासाठी लागणारी विविध उपकरणे, आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT