Grape Orchard  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कासेगावात दाक्ष बागा झाल्या जमीनदोस्त

Unseasonal Rain : पंढरपूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसात कासेगाव येथील फळावरील द्राक्ष बागा जमिनदोस्त झाल्या.

Team Agrowon

Solapur News : पंढरपूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसात कासेगाव येथील फळावरील द्राक्ष बागा जमिनदोस्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पंढरपूर तालुक्यात काल शुक्रवारी (ता. १२) पंढरपूरसह भंडीशेगाव, भाळवणी, करकंब, पट. कुरोली, पूळुज, चळे, तुंगत व कासेगाव या सर्वच महसुली मंडलांत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. पाऊस पडत असतानाच जोराचे वादळ आल्यामुळे काही भागांत फळावरील द्राक्षबागा जमिनदोस्त झाल्या.

यात सर्वाधिक फटका कासेगाव येथील शेतकऱ्यांना बसला. कासेगाव हे द्राक्ष बागांचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे सुमारे २ ते अडीच हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा उभ्या आहेत. येथील द्राक्ष हंगाम सध्या सुरू आहे. द्राक्ष उतरण्याची कामे सुरू आहेत. द्राक्ष बागांवर माल असतानाच येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली.

यात वादळ आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा जमीनदोस्त झाल्या. जमीनदोस्त झालेल्या द्राक्ष बागा उभ्या करण्याची कामे आज मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. कासेगाव येथील पांडुरंग देशमुख, सुधीर देशमुख, नानासाहेब देशमुख व पांडुरंग छोडके यांच्या द्राक्ष बागेत फेरफटका मारला असता, त्यांच्या द्राक्ष बागा जमिनदोस्त झाल्याचे चित्र दिसून आले.

या वेळी बहुतांश भागात द्राक्ष बागा पुन्हा उभ्या करण्याची कामे सुरू झाली आहेत. दाक्ष मण्यांमध्ये पाणी साठून घड सडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांच्या बागेत द्राक्ष मणी चिरू लागले आहेत. पावसात माल भिजल्यामुळे द्राक्षांचे भाव कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

पंढरपूर तालुक्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

पंढरपूर - ७.८, भंडीशेगाव - ९.३, भाळवणी - १४.५, करकंब - ८.५, पट. कुरोली - ०.३, पुळुज - १.८, चळे - ०.३, तुंगत - ०.०, कासेगाव - ९.३.

आमच्या भावाची द्राक्ष बाग कोसळून मोठे नुकसान झाले आहे. आमच्या द्राक्षाच्या बागेतील द्राक्ष मणी चिरू लागले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत.
- सुधीर देशमुख, द्राक्ष उत्पादक शेतकरी - कासेगाव, ता. पंढरपूर
पंढरपूर तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याची कामे सुरू झाली आहेत.
- सूर्यकांत मोरे, तालुका कृषी अधिकारी, पंढरपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT